fbpx

एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज्  टेनिस स्पर्धेत कबीर चोठानीला दुहेरी मुकूटाची संधी 

पाचगणी : रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् कर्नाटकच्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत अव्दिक नाटेकर, कबीर चोठानी,माया राजेश्वरन व मेघना जीडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्रने अव्दिक नाटेकर ओंकार शिंदेचा 6-1, 7-5 असा तर दुस-या मानांकीत गुजरातच्या कबीर चोठानीने चौथ्या मानांकीत आपल्या राज्यसहकारी जेविन कनानीचा 6-1, 7-6(4) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात तमिळनाडूच्या अव्वल मानांकीत माया राजेश्वरनने तिस-या  मानांकीत गुजरातच्या शैवी दलालचा 6-3, 6-3 असा तर कर्नाटकच्या सातव्या मानांकीत मेघना जीडी हीने महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत नैनिका बेंद्रमला 6-6(7-2), 6-1 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात गुजरातच्या जेविन कनानी व कबीर चोठानी या अव्वल मानांकीत जोडीने महाराष्ट्राच्या नचिकेत गोरे व देवेंद्र कुलकर्णी यांचा 6-0, 6-0 असा तर महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत जोडी नीरज रिंगणगावकर व पियूष जाधव यांनी  लक्ष गुजराथी व अर्जुन किर्तने या चौथ्या मानांकीत जोडीला 6-1, 6-1 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या देवांशी प्रभुदेसाई व नानिका रेड्डी या अव्वल मानांकीत जोडीने रिद्धी शिंदे व मेघना जीडी या तिस-या मानांकीत जोडीचा 6-2, 6-1 असा तर शैवी दलाल व पार्थसारथी मुंढे या चौथ्या मानांकीत जोडीने ऐंजल पटेल व आराध्या वर्मा यांचा 6-0, 6-1 असा पराभव करत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुले:
अव्दिक नाटेकर (महाराष्ट्र) वि.वि ओंकार शिंदे ( महाराष्ट्र)  6-1, 7-5
कबीर चोठानी(गुजरात)(2)  वि.वि  जेविन कनानी(गुजरात)(4)6-1, 7-6(4)
मुली

माया राजेश्वरन(तमिळनाडू)(1)  वि.वि   शैवी दलाल(गुजरात)(3)   6-3, 6-3
मेघना जीडी(कर्नाटक)(7) वि.वि  नैनिका बेंद्रम( महाराष्ट्र)(2) 6-6(7-2), 6-1
 
दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले:
जेविन कनानी(गुजरात)/कबीर चोठानी(गुजरात)(1) वि.वि नचिकेत गोरे( महाराष्ट्र)/देवेंद्र कुलकर्णी( महाराष्ट्र) 6-0, 6-0
नीरज रिंगणगावकर (महाराष्ट्र)/ पियूष जाधव(महाराष्ट्र) वि.वि लक्ष गुजराथी( महाराष्ट्र)/ अर्जुन किर्तने( महाराष्ट्र)(4)  6-1, 6-1
मुली
देवांशी प्रभुदेसाई ( महाराष्ट्र)/नानिका रेड्डी ( महाराष्ट्र)(1) वि.वि रिद्धी शिंदे( महाराष्ट्र)/मेघना जीडी(कर्नाटक)(3)  6-2, 6-1
शैवी दलाल(गुजरात)/ पार्थसारथी मुंढे( महाराष्ट्र  )(4)  वि.वि ऐंजल पटेल(गुजरात)/आराध्या वर्मा(ओरिसा)  6-0, 6-1

Leave a Reply

%d bloggers like this: