fbpx

शाळा महाविद्यालयात सेफ कॅम्पस योजना राबविण्यात यावी : डॉ. नीलम गोऱ्हे

बुलडाणा, : ‘जे अपात्र ठरविण्यात आले त्यांच्या कुटुंबीयांना संवाद मेळावे घ्यावेत. त्यात कोवीड काळातील मृत्यू झालेली कुटुंबे देखील आली पाहिजेत. महिलांचे वेगवेगळ्या कारणांनी होणारे स्थलांतर लक्षात घेतले पाहिजे.’ असे आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘ या महिलांची नावे त्यांच्या मृत पतीच्या नावावर असलेल्या जमिनी आणि दुकानांचे गाळे, घरे करण्याची मोहीम हाती घ्या. याकरिता आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे लागेल. त्याकरिता तालुका पातळीवर विशेष शिबिरे घ्या. अल्पशिक्षित आणि सुशिक्षित महिलांना त्यांच्याकडे असलेली कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षणे घ्या. विविध महामंडळाच्या योजनांचा आधार त्यासाठी घेता येईल. प्रत्येक महिन्यात सोमवारी पाठपुरावा करावा. हिवाळी अधिवेशनात याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.’

दिनेश गीते निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात २४८ शेतकरी आत्महत्या प्रकरणे झाली. जानेवारी पासून आता पर्यंतच्या कालावधीत त्यांची फेरचौकशी सुरू आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना या कुटुंबांसाठी प्राधान्याने द्याव्यात.

महिला बाल विकास अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड :

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणसोबत महिलांच्या विषयांवर काम केले जाते. दक्षता समितीच्या भेटी घेतल्या जातात. आश्रमशाळामध्ये माहिती घेतली जातेय. पोलिसांची महिलांबाबत माहिती आणि वर्तन याबाबत पोलिसांचे जनजागृती प्रशिक्षण करणे आवश्यक आहे विनयभंगाच्या ३५० केसेस आलेल्या आहेत.

महिलांसाठी समुपदेशन केंद्र तीन तालुक्यात सुरू आहे .. एकूण दाखल प्रकरणे 367 आली असून त्यातील निकाली निघालेली 329 आहेत तर प्रलंबित 38 आहेत.

समुपदेशन सेवा देणाऱ्या संस्थेला वार्षिक 40000 अनुदान आणि मासिक 12000/- अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येतात. जिल्ह्यात आजवर वारसा प्रमाणपत्र १२ मुलांना मिळवून दिले आहे. १०९२ विधवा महिला या काळात झाल्या आहेत. ७० महिलांना वारसा प्रमाणपत्र दिले आहे.

मनोधैर्य योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे आहे. 25 प्रस्ताव पैकी 9 मंजूर झाले आहेत. केस पाहून निधी वितरण होते. याबाबत एकूण सविस्तर माहिती आठ दिवसात पाठवा, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

जिल्ह्यातील लंपी आजाराची माहिती यावेळी पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ४२८९ जनावरे दगावली.. ३०००० गाय, २५००० बैल आणि १६००० वासरू साठी राज्य सरकारच्या वतीने दिले जातात, असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आणि त्यावरील उपाययोजनाचा आढावा यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घेतला.

डॉ. अनिता राठोड सहायक आयुक्त समाजकल्याण
५ शाळा मुलींच्या आहेत.
२४ आश्रम शाळांमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या आहेत. दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महिला अधिकारी संवाद उपक्रमांतर्गत शाळांमध्ये जाऊन निवासी स्वरूपाची पाहणी करतात. विद्यार्थिनींना बोलते करत आहेत. या उपक्रमाचे उपसभापती महोदयांनी कौतुक केले.

लोखंडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आदिवासी विभागाच्या शाळांची माहिती दिली. यावर शाळा महाविद्यालयात सेफ कॅम्पस योजना राबविण्याची सूचना यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

शेतकरी कर्ज वाटप वारसांच्या नावे देत आहोत. कर्ज वसुलीसाठी कोणताही दबाव आणत नाही. असे यावेळी जिल्हा शिखर बँकेच्या हेडव यांनी सांगितले.

याप्रसंगी, जिल्हाधिकारी डॉ. एच पी तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी अधिकारी उपस्थित होते.

८६९८००००११ महीला हेल्पलाईन बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. त्याचा लाभ संकटग्रस्त महिलांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: