fbpx

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद 

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत यश माने(4-41)च्या भेदक गोलंदाजीसह श्रेयश वाळेकर(70धावा) व साहिल चुरी(नाबाद 44धावा) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 3 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
 
पीवायसी हिंदु जिमखाना येथील मैदानावर झालेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत पीवायसीच्या यश माने(4-41), रोहित जना(2-34), आदित्य डावरे(2-44), अब्दुस सलाम(2-42) यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 49.1षटकात 207 धावावर संपुष्टात आला. यात यश जगदाळेने 141चेंडूत 8चौकार व 2षटकारासह 97 धावांची खेळी केली. त्याला टिळक जाधवने 86चेंडूत 6चौकाराच्या मदतीने 58 धावा काढून साथ दिली. व्हेरॉक संघ ९९ धावांवर ७ गडी बाद असा संघ अडचणीत असताना यश आणि टिळक यांनी सातव्या गड्यासाठी 159 चेंडूत 107 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
 
याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 48.2 षटकात 7बाद 213धावा करून हे आव्हान पूर्ण केले. यात श्रेयश वाळेकरने 107चेंडूत 5चौकार व 1षट्काराच्या मदतीने 70धावांची संयमी खेळी केली. श्रेयशला सोहम शिंदेने 37 धावा काढून साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 62 चेंडूत 43 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर साहिल चुरीने 41चेंडूत 6चौकाराच्या मदतीने नाबाद 44 धावा, गुरवीर सिंग सैनी 16 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. व्हेरॉक संघाकडून ओंकार राजपूत(3-26), ऍलन रॉड्रिक्स(1-33) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर यश माने ठरला. 
 
स्पर्धेतील विजेत्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दोशी इंजिनियर्सचे अमित दोशी, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड,  महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे आणि चॅम्पियन स्पोर्ट्सचे अमित मदन यांच्या हस्ते करण्यात आले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 49.1षटकात सर्वबाद 207 धावा (यश जगदाळे 97(141,8×4,2×6), टिळक जाधव 58(86,6×4), सुरज गोंड 27, यश माने 4-41, रोहित जना 2-34, आदित्य डावरे 2-44, अब्दुस सलाम 2-42) पराभुत वि.पीवायसी हिंदु जिमखाना: 48.2 षटकात 7बाद 213धावा(श्रेयश वाळेकर 70(107, 5×4,1×6), साहिल चुरी नाबाद 44(41, 6×4), सोहम शिंदे (37,2×4,1×6), गुरवीर सिंग सैनी 16, यतींद्र कार्लेकर 19, अमेय भावे 14, ओंकार राजपूत 3-26, ऍलन रॉड्रिक्स 1-33); सामनावीर – यश माने; पीवायसी संघ 3 गडी राखून विजयी. 
 
इतर पारितोषिके: 
सर्वोत्कृष्ट फलंदाज: यश जगदाळे(315runs);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: यश खळदकर(13wicket);
मालिकावीर: साहिल चुरी(319runs and 7wickets);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: अथर्व वणवे 
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: साहिल मदन.  

Leave a Reply

%d bloggers like this: