fbpx

मेहर प्रकाश, योगेश शहा यांना दुहेरी मुकूट; केतन धुमाळ, अमित लेटली, अजित पेंढारकर विजेतेपद !!

पुणे : सोलारीस क्लब तर्फे आयोजित चौथ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ५५ आणि ६५ वयोगटामध्ये मेहर प्रकाश आणि योगेश शहा यांनी दुहेरी मुकूट संपादन केला. केतन धुमाळ, अमित लेटली, डॉ. अजित पेंढारकर यांनी एकेरीच्या विविध गटामध्ये विजेतेपद संपादन केले.

सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ३५ वर्षावरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ याने मुंबईच्या नीरज आनंद याचा ७-५, २-२ (रिटायर) असा पराभव केला. ४५ वर्षावरील गटात अमित लेटली याने कृष्णा देवेंद्र याचा ७-५, ६-१ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. ५५ वर्षावरील गटात मेहर प्रकाश याने उल्हास फैझल याचा ६-१, ३-६, १०-८ असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. ६५ वर्षावरील गटामध्ये चुरशीने लढलेल्या गेलेल्या सामन्यात योगेश शहा याने हनिफ अब्दुल याचा ६-४, ३-६, १०-४ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. ७० वर्षावरील गटात डॉ.अजित पेंढारकर याने डीएस रंगा राव याचा ६-४, ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

दुहेरी गटामध्ये ३५ वर्षावरील गटामध्ये रविंद्र पांड्ये आणि नीरज आनंद यांनी नितीन सावंत आणि ज्यो बॅनर्जी ६-२, ६-४ या जोडीचा पराभव करून विजेतेपद मिळवले. ४५ वर्षावरील गटात अजित साई व मदन गोखले यांनी एच.एस. चिरजा व जी.एस. चढ्ढा या जोडीचा ६-२, ६-० असा पराभव करत विजेतेपद मिळवले. ५५ वर्षावरील गटात मेहर प्रकाश व हिमांशु गोसावी या जोडीने के.व्हि. रामा राजू आणि मधुकरण यांचा ६-०, ६-२ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. ६५ वर्षावरील गटात योगेश शहा व हनिफ अब्दुल तसेच ७० वर्षावरील गटात व्हिएलएसएन राजु व ए.आर. राव या जोडीने विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीचे संचालक जयंत पवार, सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली, बढेकर डेव्हलपर्सचे संचालक हृषीकेश ढोबळे, डॉ. निकोला पवार, जोनस पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, करंडक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी क्लबचे समन्वयक
राजेश सपकाळ, खेळाडू, प्रशिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकालः सर्व अंतिम फेरीः एकेरीः
३५ वर्षावरील गटः केतन धुमाळ वि.वि. नीरज आनंद ७-५, २-२ रिटायर;
४५ वर्षावरील गटः अमित लेटली वि.वि. कृष्णा देवेंद्र ७-५, ६-१;
५५ वर्षावरील गटः मेहर प्रकाश वि.वि. उल्हास फैझल ६-१, ३-६, १०-८;
६५ वर्षावरील गटः योगेश शहा वि.वि. हनिफ अब्दुल ६-४, ३-६, १०-४;
७५ वर्षावरील गटः डॉ.अजित पेंढारकर वि.वि. डीएस रंगा राव ६-४, ६-४;

दुहेरीः अंतिम फेरीः
३५ वर्षावरील गटः रविंद्र पांड्ये/नीरज आनंद वि.वि. नितीन सावंत/ज्यो बॅनर्जी ६-२, ६-४;
४५ वर्षावरील गटः अजित साई/मदन गोखले वि.वि. एच.एस. चिरजा/जी.एस. चढ्ढा ६-२, ६-०;
५५ वर्षावरील गटः मेहर प्रकाश/हिमांशु गोसावी वि.वि. के.व्हि. रामा राजू/मधुकरण ६-०, ६-२;
६५ वर्षावरील गटः योगेश शहा/हनिफ अब्दुल वि.वि. एम. सुरेश/ए. सुरेश ४-६, ६-४, १०-४;
७० वर्षावरील गटः
व्हिएलएसएन राजु/ए.आर. राव वि.वि. डी.एस. रामा राव/अजित पेंढारकर ७-५, ४-६, १३-११;

Leave a Reply

%d bloggers like this: