fbpx

शेफ्लर इंडियाच्या जल सहारा प्रकल्पाने “सी एस आर इम्पॅक्ट”  पुरस्कार जिंकला

पुणे : अग्रगण्य औद्योगिक आणि ऑटोमोटीव्ह पुरवठादार शेफ्लर इंडिया लिमिटेडने ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा विभागामध्ये ‘जलसहारा’ प्रकल्पासाठी प्रतिष्ठित सी एस आर इम्पॅक्ट पुरस्कार जिंकला. हा प्रकल्प सी एस आर ब्रॅंड – एच ओ पी इ (होप )चा एक महत्त्वाचा भाग आहे. सदर कार्यक्रम १५ नोव्हेंबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथे सी एसआर बी ओ एक्स (सी एस आर बॉक्स)आणि दालमिया भारत फाऊंडेशन द्वारा  सह-प्रस्तुत केला होता.

मानव संसाधन आणि सी एस आर विभागाचे उपाध्यक्ष शंतनू घोषाल  म्हणाले की, “ सामाजिक परिवर्तन आणि सक्षमीकरणासाठी आमच्या सातत्यपुर्ण केलेल्या प्रयत्नांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. जल सहारा प्रकल्प हा एक बहू वर्षीय प्रकल्प असून त्यामूळे १४०० हेक्टर जमीन पाणलोट विकासाखाली आणली आहे आणि महराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २१६८ पेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झालेला आहे. आम्ही आमच्या विश्वासू भागीदार बी ए आय एफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन यांना त्यांच्या योगदानाबद्दल तसेच सी एस आर बॉक्सच्या या प्रकल्पाला हा सन्मान दिल्याबद्दल आभार मानतो. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने आम्ही आमच्या भावी पिढीसाठी सामाजिक परिवर्तन आणायला आणि एक चांगले जग निर्माण करायला प्रयत्नशील राहण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

जलसहारा विषयी: जलसंधारण आणि शाश्वत शेती प्रकल्प ऐरणीचा प्रश्न-

जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी हवामान बदल हे कृषि, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण उपजीविका यासाठी एक मोठे आवाहन म्हणून उदयास येत आहे. पर्जन्यमानाच्या       मध्ये व्यत्यय, वाढती पाणी टंचाई हे अशा लोकांवर परिणाम करत आहेत जे पावसावर पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून अवलंबून आहेत. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेती क्षेत्र असलेल्या, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील तडवळे  आणि आसपास राहणारे २१६८ लोकांसाठी सुद्धा हीच परिस्थिती होती. अपूऱ्या आणि अनियमित पावसाचा पीक पद्धती वर परिणाम होत होता, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पीक घेण्यात अडचणी येऊ लागल्या.

आमची उपाययोजना:

मे २०१९ च्या दरम्यान शेफ्लरने  या भागामध्ये जल सहारा प्रकल्प चालू केला. या परिसरातील शेती विषयक, पशूधनासंबंधी आणि घरगुती गरजा समजून घेण्यासाठी दोन महीने तपशीलवार अभ्यास केला गेला. डी पी आर च्या निर्देशांनुसार, पुनर्भरण तलावांची निर्मिती, नाल्यांचे खोलीकरण, नवीन चेक बंधारे बांधणे, विद्यमान चेक बंधारे गाळमुक्त करणे यासह पावसाचे पाणी साठविन्यासाठी पाणलोट विकासाच्या दृष्टिकोनातून १४०० हेक्टर जमिनीवर प्रक्रिया करण्यात आली. याशिवाय मातीची गुणवत्ता आणि जल संधारण सुधारण्यासाठी शेत तळे बांधणे, पाणी शोषून घेणारे खंदक बनविणे, सांडपाण्याचे पाइप दुरुस्ती आणि वृक्षारोपण यांसारख्या अनेक उपाय योजना अंमलात आणल्या गेल्या. हा प्रभाव शाश्वत राहावा यासाठी स्थानिक लोकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले आणि त्यांना पिकांमध्ये वैविध्य कसे आणायचे, ठिबक सिंचन तंत्रज्ञान कसे वापरायचे, पाण्याची बचत करत चारा कसा वाढवायचा याचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. कामांना चालना देण्यासाठी, शेतीमध्ये विविधीकरण आणण्यासाठी बियाणे व चारा वाटप करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: