राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच नाव कळीचा नारद पाहिजे होत – वसंत मोरे
पुणे : आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मनसेचे कट्टर नेते वसंत मोरे यांनीसुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. याच नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत असं ते म्हणाले आहेत.
राज्यात सर्वच पातळीवरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले जात आहे. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच राज्यभरात कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलने करत निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच वसंत मोरे यांनी कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत अशी जोरदार टीका त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तर आमच्या राजांना एकेरी ना तर मग तू कोण लागून गेलाय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
