Wednesday, June 24, 2026
Latest NewsSports

रवि कोठारी, रविंद्र पांड्ये, संतोष दळवी, केतन धुमाळ दुसर्‍या फेरीत !!

पुणे :  सोलारीस क्लब तर्फे आयोजित चौथ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षावरील गटात रवि कोठारी, रविंद्र पांड्ये, संतोष दळवी, केतन धुमाळ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या ३५ वर्षावरील गटाच्या पहिली फेरीत रविंद्र पांड्ये यांनी राहूल कोठारी याच्यावर ६-२, ४-६, १०-६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. संतोष दळवी याने दिनेश चंद्रा याचा ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. माजी विजेता केतन धुमाळ याने श्रीराम ओक याचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. अतितटीच्या झालेल्या सामन्यात रवि कोठारी याने राजेश मोदाडे याच्यावर ७-५, ३-६, १०-६ असा संघर्षपूर्ण पराभव केला. निखील बापट याने मिलींम मावणे याचा ६-१, ६-२ असा तर, रतिश रातुसारीया याने आदित्य अभ्यंकर याचा ६-२, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः ३५ वर्षावरील गटः पहिली फेरीः
रविंद्र पांड्ये वि.वि. राहूल कोठारी ६-२, ४-६, १०-६; संतोष दळवी वि.वि. दिनेश चंद्रा ६-४, ६-२;
केतन धुमाळ वि.वि. श्रीराम ओक ६-१, ६-१; रवि कोठारी वि.वि. राजेश मोदाडे ७-५, ३-६, १०-६;
निखील बापट वि.वि. मिलींम मावणे ६-१, ६-२; रतिश रातुसारीया वि.वि. आदित्य अभ्यंकर ६-२, ६-१;

५५ वर्षावरील गटः पहिली फेरीः
धरमवीर सिंग वि.वि. एकनाथ घोडकर ६-४, ६-२; रफिक खोटे वि.वि. प्रविण पाटील ६-२, ६-२;
कर्नल सी. दलाल वि.वि. प्रशांत जोहरी ६-१, ६-२; रमेश अय्यर वि.वि. वाय. भाग्यंगराव ६-१, ६-०;
मिलींद घैसास वि.वि. धनराज बसमत ६-४, ६-१; रवि नगरकर वि.वि. मेहश बजाज ६-३, ६-३;

७० वर्षावरील गटः पहिली फेरीः
लक्ष्मण अंबालकर वि.वि. हंसराज पाटील ६-४, ४-६, १०-७;
शाम गायकवाड वि.वि. प्रदीप कुंचूर ६-३, ६-३;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading