राज्यपाल भगतसिंग कोसरी यांना तात्काळ बडतर्फ करून महाराष्ट्रातून हाकलून द्या… – संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
पुणे : महाराष्ट्रद्रोही तथा शिवद्रोही भाजप राज्यपाल भगतसिंग कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. आरएसएस ची काळी टोपी घालून घाणेरडे विचार महाराष्ट्रात पेरण्यासाठीच प्रधानमंत्री व राष्ट्रपती यांनी भगतसिंह कोशारी यांची नियुक्ती महाराष्ट्रात केली. वाचाळवीरांचा महानायक म्हणून यांची नोंद झाली. महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सतत चुकीची माहिती देऊन खोटा इतिहास सांगण्याचा मांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न कोशारी करत आहेत. घटनात्मक पदावर बसणारा माणूस एवढा शिवद्रोही कसा असू शकतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून एक तर राजीनामा द्यावा नाहीतर केंद्र सरकारकडे भगतसिंग कोषारी यांची हकालपट्टीची मागणी करावी… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी केले.
‘हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात…’ यासारखे मावळ्यांना अकराळ विक्राळ दाखवणारे आणि छत्रपती सरदार आणि मावळ्यांची बदनामी करणारे घाणेरडे चित्रपट चुकीच्या पद्धतीने इतिहासाला तोडून मोडून दाखवले जातात. तरीही महाराष्ट्र सरकार उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहे. याउलट मुख्यमंत्रीच जर खोट्या इतिहासाला पाठिंबा देणार असतील तर शिवद्रोह्यांची टोळी महाराष्ट्र सरकार मध्ये काम करत आहे महाराष्ट्र सरकारने खोट्या इतिहासाला व इतिहास निर्माण करणाऱ्याला पाठीशी घालू नये तात्काळ वादग्रस्त चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रतापगडावर अफजलखानाचे वधाचे संपूर्ण शिल्प दाखवावे. अफजलखाना सोबत शिवरायांना संपवण्यासाठी कृष्णा भास्कर कुलकर्णी सुद्धा आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार कुलकर्णी यांनीच केला होता. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी उभा कापला होता हा इतिहास आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने व सांस्कृतिक विभागाने प्रतापगडावर संपूर्ण शिल्प उभे करावे खोडसाळ पूर्णपणे अपूर्ण इतिहास दाखवू नये. अफजलखानाच्या वधा बरोबर कृष्णा कुलकर्णीचा सुद्धा वध दाखवून संभाजी कावजी यांचा सुद्धा पुतळा उभा करावा अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे. अन्यथा प्रतापगडाच्या पायथ्याशी आठ दिवसात संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.
सातारा संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने सातारा जिल्ह्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे बोलत होते.
यावेळी पत्रकार परिषदेस सहसंघटक सुयोग औंधकर, पुणे शहराचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तेजस्विनी केसरकर, सातारा शहराध्यक्ष रोहित जाधव, अॕड. दशरथ निकम, हाजी मलंग नदाफ, सचिन जाधव, संदीप कुदळे, महबूब पठाण, आशिष खवळे, इमरान कच्ची, विकास पवार, अधिक बागवान, राजेश तांगडे, सुरज गायकवाड, अॕड. वनिता भोसले, माधुरी दाभाडे, उज्वला निकम, सुजाता शिवशिखरे, उषा गवळी, रेणुका भास्कर व विनोद कांबळे आदी उपस्थित होते.
