Tuesday, June 23, 2026
BusinessLatest News

अ‍ॅक्सिस बँकेने उत्तम ब्रांच बँकिंग आणि एमएसएमई क्षमतेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाप्रती कटिबद्धता अधिक दृढ केली

 

मुंबई : अ‍ॅक्सिस बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आज मुंबईत आयोजित एका मीडिया राउंडटेबलमध्ये (पत्रकार परिषद), तिची एकात्मिक ब्रांच बँकिंग आणि एमएसएमई फ्रँचायझी महाराष्ट्रातील व्यवसाय वृद्धी आणि वित्तीय समावेशनाल कशा प्रकारे पाठबळ देत आहे, याची रूपरेषा मांडली.

अ‍ॅक्सिस बँकेचे वरिष्ठ नेते, ज्यामध्ये संजीव मोघे, ग्रुप हेड – ब्रांच बँकिंग, साऊथ; विजय शेट्टी, ग्रुप हेड – कमर्शियल बँकिंग ग्रुप; आणि प्रशांत टी.एस., ग्रुप हेड – मिड-कॉर्पोरेट आणि मीडियम एंटरप्रायझेस ग्रुप यांचा समावेश आहे, त्यांनी महाराष्ट्रातील ग्राहक आणि व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी बँकेच्या नातेसंबंध-आधारित शाखा नेटवर्क आणि एमएसएमई-केंद्रित क्षमतांना एकत्र आणण्याच्या बँकेच्या दृष्टिकोनावर चर्चा केली.

ब्रांच बँकिंगचा नवा चेहरा

विश्वास आणि स्थानिक नातेसंबंधांचे निरंतर महत्त्व ओळखून अ‍ॅक्सिस बँक आपली प्रत्यक्ष उपस्थिती सातत्याने वाढवत आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेचे देशांतर्गत नेटवर्क ६,२७५ शाखा आणि १२,७९६ एटीएम व कॅश रीसायकलर्सवर पोहोचले होते, ज्यामध्ये जवळपास ४७ टक्‍के शाखा ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये आहेत.

आपल्या राष्ट्रीय उपस्थितीपलीकडे जाऊन, बँकेने महाराष्ट्र आणि मुंबईत लक्षणीय विस्तार केला आहे:

  • महाराष्ट्र नेटवर्क: ६४० शाखा आणि २,०२१ एटीएम व कॅश डिपॉझिट मशीन्स
  • मुंबई नेटवर्क: २६२ शाखा आणि १,०४८ एटीएम व कॅश डिपॉझिट मशीन्स

ग्राहक सेवा अधिकाधिक प्रमाणात डिजिटल चॅनेल्सकडे वळत असल्याने बँक शाखा आता केवळ व्यवहार प्रक्रियेपुरत्या मर्यादित न राहता सल्लागार, नातेसंबंध व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

ग्राहक वर्गामध्ये वाढलेल्या प्रबळ डिजिटल स्वीकारामुळे हा बदल घडून येत आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या ओम्नीचॅनेल परिसंस्‍थेमध्ये आता जवळपास ७४ टक्‍के दैनंदिन सेवा विनंत्या डिजिटल पद्धतीने पूर्ण केल्या जातात, ज्‍यामधून डिजिटल-फर्स्ट बँकिंग अनुभवांबद्दल ग्राहकांची वाढती पसंती दिसून येते.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ मुंबईतही हा बदल तितकाच स्पष्टपणे दिसून येत आहे, जिथे मोबाईल बँकिंगचा प्रसार वार्षिक ११ टक्क्यांनी वाढला आहे, जे डिजिटल एंगेजमेंटच्या दिशेने होत असलेले सातत्यपूर्ण प्रगतीपर पाऊल अधोरेखित करते.

ग्राहक दैनंदिन व्यवहारांसाठी अधिकाधिक डिजिटल चॅनेल्सचा वापर करत असल्याने, बँकेच्या शाखांमधील टीम्स आता वेल्थ मॅनेजमेंट (संपत्ती व्यवस्थापन), कर्ज वितरण, गुंतवणूक आणि कॉर्पोरेट बँकिंग यांसारख्या अधिक अर्थपूर्ण ग्राहक संवादांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

हा बदल महाराष्ट्रातील वैविध्‍यपूर्ण एमएसएमई क्षेत्रासाठी विशेषतः प्रासंगिक आहे, जिथे उद्योजक अखंड डिजिटल अनुभवासोबत विश्वासू नातेसंबंध, स्थानिक बाजारपेठेची समज आणि वैयक्तिकृत आर्थिक मार्गदर्शनाला महत्त्व देणे सुरू ठेवतात.

महाराष्ट्राच्या एमएसएमई परिसंस्थेला पाठबळ

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि उद्योजकीय केंद्रांपैकी एक आहे, जे एमएसएमई, निर्यातदार, उत्पादक, स्टार्टअप्स आणि कौटुंबिक मालकीच्या व्यवसायांच्या वैविध्यपूर्ण परिसंस्थेचे माहेरघर आहे.

या गतिमान परिसंस्थेत, अ‍ॅक्सिस बँक आपल्या एमएसएमई फ्रँचायझी आणि ब्रांच बँकिंग नेटवर्कची ताकद एकत्र आणते, ज्यामध्ये विविध क्षेत्रांतील व्यवसाय वृद्धीला पाठबळ देण्यासाठी ऑन-ग्राउंड पोहोच, नातेसंबंध-आधारित सहभाग आणि डिजिटल-फर्स्ट क्षमतेचा मेळ घातला आहे.

या विस्ताराला वैविध्यपूर्ण एमएसएमई फ्रँचायझीचे पाठबळ लाभले आहे. मार्च २०२६ पर्यंत अ‍ॅक्सिस बँकेचे एकत्रित स्मॉल बिझनेस बँकिंग, एसएमई आणि मिड-कॉर्पोरेट बुक अंदाजे २.९३ लाख कोटी रुपयांवर होते, ज्याचा बँकेच्या कर्ज पुस्तिकेत २३.८ टक्‍के वाटा आहे. यामधून भारताच्या वास्तविक अर्थव्यवस्थेला वित्तपुरवठा करण्यामधील बँकेची वाढती भूमिका निदर्शनास येते.

व्यवसाय विस्तारत आहेत आणि अधिकाधिक डिजिटल होत आहेत, तशा त्यांच्या बँकिंग गरजा केवळ कर्ज उपलब्ध होण्याच्या पलीकडे विकसित होत आहेत. आज उद्योजक अशा एकात्मिक उपायांच्या शोधात आहेत, जे त्यांना खेळते भांडवल कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास, संकलन आणि पेमेंट सुलभ करण्यास, व्यापार व ट्रेझरी क्षमतेचा लाभ घेण्यास आणि वाढीच्या संधी आत्मविश्वासाने शोधण्यास मदत करतील.

अ‍ॅक्सिस बँकेचे शाखा नेटवर्क या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. डिजिटल चॅनेल्स जलद बँकिंग सक्षम करत असले, तरी रिलेशनशिप मॅनेजर्स आणि शाखेतील टीम्स या विश्वासू सल्लागार म्हणून कायम आहेत, ज्या व्यावसायिक मालकांना क्रेडिट स्ट्रक्चरिंग (कर्ज रचना), विस्तार योजना आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांवर मार्गदर्शन करतात.

स्थानिक उपस्थिती, क्षेत्रनिहाय नैपुण्य आणि डिजिटल नवोन्मेष यांचा हा मेळ बँकेला सूक्ष्म उद्योग आणि पारंपरिक एसएमईपासून ते विकासाच्या टप्प्यावरील आणि नवीन युगातील डिजिटल व्यवसायांपर्यंतच्या विस्तृत श्रेणीतील व्यवसायांना पाठबळ देण्यास मदत करत आहे.

पोर्टफोलिओमधील ही वाढ सर्वसमावेशक राहिली आहे, ज्यामध्ये एसबीबी बुक वार्षिक १७ टक्‍के वाढीसह ७८,०१८ कोटी रुपयांवर; एसएमई बुक वार्षिक २४ टक्‍के वाढीसह १,४७,१५९ कोटी रुपयांवर; आणि मिड-कॉर्पोरेट बुक वार्षिक ३३ टक्‍के वाढीसह ६७,९६९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या फ्रँचायझीमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व त्याच्या ग्राहक संख्या आणि व्यावसायिक उपस्थितीच्या विस्तारावरून दिसून येते:

  • महाराष्ट्राचा वैविध्यपूर्ण व्यावसायिक पाया उत्पादन, व्यापार, सेवा, लॉजिस्टिक्स, केमिकल्स, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल्स आणि निर्यातीपर्यंत पसरलेला आहे.
  • मुंबई, पुणे आणि नाशिक ही कमर्शियल बँकिंग आणि परिसंस्था-नेतृत्वाखालील वित्तपुरवठा कार्यक्रमांसाठी बँकेची प्रमुख व्यावसायिक केंद्रे आहेत.
  • मुंबई आणि पुणे हे बँकेच्या सर्वात मोठ्या अ‍ॅफ्ल्युअंट आणि बिझनेस बँकिंग बाजारपेठांपैकी आहेत.
  • मुंबईतील बर्गंडी ग्राहकांचा सरासरी खात्याचा आकार राष्ट्रीय सरासरीपेक्षा अंदाजे १३ टक्‍के जास्त आहे.

विविध क्षेत्रे आणि ग्राहक वर्गांमधील विकासाला पाठबळ

महाराष्ट्रातील कर्जाची मागणी चांगल्या प्रकारे वैविध्यपूर्ण राहिली आहे, ज्यामध्ये कापड आणि पोशाख, केमिकल्स, इंजिनिअरिंग, ऑटो घटक, फार्मास्युटिकल्स, फूड प्रोसेसिंग (अन्न प्रक्रिया) आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत.

या क्षेत्रांमधील व्यवसायांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अ‍ॅक्सिस बँक सूक्ष्म उद्योग आणि महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईसह वंचित आणि उदयोन्मुख ग्राहक वर्गांवर आपले लक्ष केंद्रित करणे सुरुच ठेवत आहे. गरजेनुसार तयार केलेले कर्ज पर्याय, क्युरेटेड प्रोग्राम्स आणि बंडल बँकिंग ऑफर्सच्या माध्यमातून बँक औपचारिक कर्ज आणि विकास भांडवलाची उपलब्धता वाढवत आहे.

वित्तपुरवठ्याच्या पलीकडे जाऊन, अ‍ॅक्सिस बँक इव्हॉल्व्ह आणि डिजिटल इव्हॉल्व्ह यांसारख्या ज्ञान-सामायिकीकरण उपक्रमांद्वारे उद्योजकांना पाठबळ देत आहे, जे व्यवसायांना वाढ, डिजिटल स्वीकार आणि बदलत्या बाजारपेठेतील गतिशीलता समजून घेण्यास मदत करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यावहारिक सल्ला आणि नेटवर्किंगच्या संधी प्रदान करतात.

या प्रयत्नांना बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण “वन अ‍ॅक्सिस” दृष्टिकोनाची जोड मिळाली आहे, जो बँकिंग, कर्ज, ट्रेझरी, ट्रेड (व्यापार), वेल्थ आणि इन्व्हॉईस डिस्काउंटिंग सोल्यूशन्स एकाच नातेसंबंधाच्या माध्यमातून एकत्र आणतो, ज्यामुळे व्यवसायांना अधिक एकात्मिक वित्तीय परिसंस्थेचा लाभ घेणे शक्य होते.

परिसंस्था-नेतृत्वाखालील वित्तपुरवठा हा एमएसएमईच्या विकासासाठी झपाट्याने एक महत्त्वाचा आधार बनत आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या सप्लाय चेन फायनान्स बुकमध्ये वार्षिक ३६ टक्‍के वाढ झाली आहे, जी उत्पादन, व्यापार आणि वितरण परिसंस्थेमधील मजबूत स्वीकार दर्शवते; तर इन्व्हॉईसमार्टने एमएसएमईच्या इन्व्हॉईसेसच्या माध्यमातून २.७८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वित्तपुरवठा सुलभ केला आहे, ज्यामुळे व्यवसायांना त्यांची रोखता सुधारण्यास आणि खेळते भांडवल अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत होत आहे.

डिजिटलचा स्वीकार वेगाने वाढत असतानाही, विश्वासू नातेसंबंध व्यवसाय बँकिंगचा पाया म्हणून कायम आहेत. सध्या सुरक्षित नसलेल्या व्यावसायिक कर्जाच्या वितरणापैकी जवळपास ७५ टक्‍के प्रक्रिया एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रियेद्वारे पूर्ण केली जाते, तर स्मॉल बिझनेस बँकिंगचा ७९ टक्‍के व्यवसाय अद्यापही शाखा-नेतृत्वाखालील सहभागातून सुरू होतो, हे डिजिटल सुलभता आणि नातेसंबंध-आधारित बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे एकत्र काम करत आहेत, हे अधोरेखित करते.

हे एकात्मिक मॉडेल शिस्तबद्ध अंडररायटिंग, क्षेत्र-विशिष्ट जोखीम आराखडे आणि पोर्टफोलिओ गुणवत्तेवर असलेल्या मजबूत लक्ष्यावर आधारित आहे; ज्यामध्ये ८४ टक्‍के एसएमई बुक हे एसएमई३ किंवा त्याहून सरस मानांकन असलेले आहे, ८६ टक्‍के एसएमई पोर्टफोलिओ पीएसएल सुसंगत आहे आणि स्मॉल बिझनेस बँकिंग पोर्टफोलिओपैकी अंदाजे ७२ टक्‍के भाग सुरक्षित आहे.

ग्राहक सहभाग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

ग्राहकांच्या अपेक्षा सातत्याने बदलत असताना, अ‍ॅक्सिस बँक विविध क्षेत्रांमध्ये ग्राहक सहभाग वाढवण्यासाठी, सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी एआय आणि अ‍ॅनालिटिक्सचा अधिकाधिक वापर करत आहे.

डिजिटल मर्चंट कॅश अ‍ॅडव्हान्स सारखे डिजिटल कर्ज पर्याय व्यवहार आणि पेमेंट डेटाचा वापर करून परतफेड क्षमतेचे मूल्यांकन करतात आणि प्रत्यक्ष रोख प्रवाहाशी सुसंगत व्यावसायिक कर्जे देतात. यामुळे किमान कागदपत्रांसह खेळते भांडवल वेगाने उपलब्ध होते.

‘सिध्दी’ सारखे एआय-संचलित प्लॅटफॉर्म्स रिलेशनशिप टीम्सना ग्राहकांचे अचूक विश्लेषण आणि सहभागाच्या संधी उपलब्ध करून देतात, तर बँकेचा जनरेटिव्ह एआय असिस्टंट ‘आदी’ कर्मचाऱ्यांना रिअल-टाइममध्ये माहिती आणि कामकाजाचे मार्गदर्शन मिळवण्यास सक्षम करतो.

तंत्रज्ञानाचा नातेसंबंध-आधारित बँकिंगशी मेळ घालून, अ‍ॅक्सिस बँक प्रतिसादात्मकतेत सुधारणा करत आहे, टर्नअराउंड टाईम कमी करत आहे आणि रिटेल, अ‍ॅफ्ल्युअंट व बिझनेस बँकिंग क्षेत्रांमध्ये अधिक वैयक्तिकृत अनुभव प्रदान करत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत

अ‍ॅक्सिस बँकेचे ग्रुप हेड – ब्रांच बँकिंगसाऊथ, संजीव मोघे म्हणाले, “बँकिंग क्षेत्रात एक रचनात्मक बदल (structural shift) पाहायला मिळत आहे. व्यवहार अधिकाधिक डिजिटल झाले असले, तरी आर्थिक निर्णय अजूनही अत्यंत वैयक्तिक आहेत. म्हणूनच, शाखांचे रूपांतर आता सल्लागार-नेतृत्वाखालील नातेसंबंध केंद्रांमध्ये होत आहे, जिथे ग्राहक संपत्ती निर्मिती, गुंतवणूक, कर्ज आणि व्यवसाय वृद्धीबाबत मार्गदर्शन घेतात. महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि अखंड फिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष उपस्थिती आणि डिजिटल क्षमता या दोन्हीमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत.”

अ‍ॅक्सिस बँकेच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपचे ग्रुप हेड, विजय शेट्टी म्हणाले, “महाराष्ट्र दीर्घकाळापासून भारताचे एक प्रमुख आर्थिक शक्तीकेंद्र राहिले आहे, पण आज प्रामुख्याने लक्षवेधी ठरत असलेली गोष्ट म्हणजे विविध क्षेत्रे आणि उद्योगांच्या आकारमानानुसार झालेली विकासाची व्यापकता होय. प्रस्थापित मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सपासून (उत्पादन केंद्रे) ते नवीन युगातील व्यवसाय आणि निर्यातदारांपर्यंत; कंपन्या आता अशा भागीदारांच्या शोधात आहेत जे त्यांना कार्यक्षमता सुधारण्यास आणि विकासाच्या नवीन संधी समोर आणण्यास मदत करू शकतील. आज बँकिंग क्षेत्र व्यवसायांना केवळ व्यवहारांच्या पलीकडे जाऊन मदत करत आहे; ते त्यांना वाढण्यास, विस्तार करण्यास आणि स्पर्धा करण्यास सक्षम करत आहे. उद्योगांच्या विकासाच्या या पुढील टप्प्याचे नेतृत्व महाराष्ट्र करत आहे.”

अ‍ॅक्सिस बँकेच्या मिड-कॉर्पोरेट आणि मीडियम एंटरप्रायझेस ग्रुपचे ग्रुप हेड प्रशांत टी.एस. म्हणाले, “एमएसएमईच्या विकासाचा पुढील दशक हा फॉर्मलायझेशन (औपचारिकीकरण), डिजिटलचा स्वीकार आणि संस्थात्मक भांडवलाच्या अधिक सुलभतेने निर्धारित होईल. आजचे उद्योजक अधिक महत्त्वाकांक्षी व्यवसाय उभारणी करत आहेत, तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करत आहेत आणि राष्ट्रीय व जागतिक मूल्य साखळ्यांशी जोडले जात आहेत. यासाठी एका वेगळ्या बँकिंग मॉडेलची आवश्यकता आहे, असे मॉडेल जे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया, जलद कर्ज उपलब्धता आणि नातेसंबंध-आधारित मार्गदर्शनाचा मेळ घालते. महाराष्ट्राची उद्योजकीय परिसंस्था हा बदल दर्शवते आणि आमचा विश्वास आहे की, भारताच्या विकास गाथेत अशीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील.”

महाराष्ट्रात सर्वसमावेशक विकासाला चालना

अ‍ॅक्सिस बँक शाखा-नेतृत्वाखालील पोहोच, आर्थिक जागरूकता उपक्रम आणि समुदाय-केंद्रित कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहक सहभाग वाढवणे सुरू ठेवत आहे. हे प्रयत्न ग्राहकांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी, आर्थिक साक्षरतेत सुधारणा करण्यासाठी आणि विविध ग्राहक वर्गांमध्ये बँकिंग सेवांचा विस्तार करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

बँक शैक्षणिक कार्यक्रम, तज्ज्ञांची सत्रे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या उपक्रमांद्वारे जागतिक एमएसएमई दिन आणि ग्राहक संरक्षण जागरूकता सप्ताह यांसारखे महत्त्वाचे प्रसंग देखील साजरे करते, जे उद्योजकांना पाठबळ देण्याच्या आणि जबाबदार बँकिंग पद्धतींना प्रोत्साहन देण्याप्रती बँकेच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतात.

बँकिंगच्या पलीकडे जाऊन आपल्या ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञानाशी सुसंगत राहत अ‍ॅक्सिस बँक ग्रामीण उपजीविका, आरोग्य सेवा, शिक्षण, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि महिला सक्षमीकरणावर केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वसमावेशक विकासासाठी आपले योगदान देत आहे.

राज्यातील बँकेच्या सीएसआर उपक्रमांनी ३.३ लाखांपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना सक्षम केले आहे, ३ लाखांहून अधिक व्यक्तींसाठी वित्तीय समावेशन सुलभ केले आहे, कौशल्य उपक्रमांच्या माध्यमातून ७,३०० हून अधिक तरुणांना पाठबळ दिले आहे आणि ७ लाखांहून अधिक लोकांच्या कर्करोग तपासणीची सोय केली आहे.

या प्रयत्नांच्या माध्यमातून, अ‍ॅक्सिस बँक महाराष्ट्राच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासात आणि सर्वसमावेशक वाढीमध्ये आपले योगदान देणे सुरूच ठेवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading