Friday, August 28, 2026
BusinessLatest News

ॲक्सिस मॅक्स लाईफचा दावा निकाली काढण्याचा विक्रमी दर

पुणे   : ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेडने (पूर्वाश्रमीची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) आर्थिक वर्ष २०२५२६ मध्ये वैयक्तिक मृत्यू दाव्यांच्या निकाली काढण्याच्या प्रमाणात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने यावर्षी २०,५२९  वैयक्तिक मृत्यू दावे मंजूर करत तब्बल १,६४१ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. यामुळे कंपनीचा वैयक्तिक मृत्यू दावा निकाली काढण्याचा दर ९९. टक्क्यांवर पोहोचला असूनहा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे.

 

मागील पाच वर्षांमध्ये कंपनीच्या दावा निकाली काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ –२२ मध्ये हा दर ९९.३४ टक्के होताजो २०२२ –२३ मध्ये ९९.५१ टक्के२०२३ -२४ मध्ये ९९.६५ टक्के२०२४-२५ मध्ये ९९. टक्के आणि २०२५२६ मध्ये ९९. टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ आर्थिक वर्ष २०२१२२ मधील ९९.३४ पासून वाढत आता ९९. टक्के हा नवीन बेंचमार्क स्थापित झाला आहे. कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकूण २,४३,५२४ पॉलिसींवरील मृत्यू दाव्यांपोटी ११,७७२.२१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना ॲक्सिस मॅक्स लाईफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमित मदान म्हणाले, “ॲक्सिस मॅक्स लाईफमध्ये आम्ही दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स आणि डिजिटल फॉरेन्सिक्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. त्यातून आर्थिक वर्ष २०२५२६ मधील ९९. टक्के दावे निकाली काढण्याचा विक्रमी दर गाठण्याला चालना मिळाली आहे. हा दर केवळ एक आकडा नसून ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे दृढ प्रतीक आहे. प्रत्येक दाव्यामागे एका कुटुंबाची सुरक्षितता दडलेली असते आणि त्यांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अभिमान आहेयाची तो आठवण करून देतो.”

दावा प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी कंपनीने अंडररायटिंग प्रक्रियेत प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्सचा वापर वाढवला असूनडिजिटल फॉरेन्सिक साधनांच्या मदतीने फसवणूक नियंत्रण यंत्रणाही अधिक मजबूत केली आहे. या प्रयत्नांमुळे हंसा रिसर्चच्या ‘लाईफ इन्शुरन्स क्यूईएस २०२६’ अहवालात भारतीय जीवन विमा कंपन्यांमध्ये ॲक्सिस मॅक्स लाईफला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading