Saturday, August 29, 2026
BusinessLatest News

टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२६ ची घोषणा; पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू

मुंबई : माहिती तंत्रज्ञान, सल्ला आणि व्यावसायिक उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) (BSE: 532540, NSE: TCS) आपली प्रमुख आंतरशालेय क्विझ स्पर्धा, ‘टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२६’ सुरु होत असल्याची घोषणा केली असून, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आता सुरू झाली आहे.

हे या क्विझचे २८ वे वर्ष आहे. देशभरातील विद्यार्थी यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. ही स्पर्धा त्यांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित करते. तसेच, या वेगाने बदलणाऱ्या जगात आघाडीवर राहण्यासाठी ती त्यांना प्रेरणा देते. ‘टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२६’ हा विविध विषयांचा समावेश असलेला, मनोरंजक पद्धतीने चालवला जाणारा शिक्षण उपक्रम आहे. इयत्ता ८ वी ते १२ वी चे विद्यार्थी, तसेच प्री-युनिव्हर्सिटी आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होण्यास पात्र आहेत. ही क्विझ देशभरातील १२ शहरांमध्ये आयोजित केली जाईल – पुणे, इंदूर, बंगळूर, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, भुवनेश्वर, कोची, कोलकाता आणि मुंबई. प्रत्येक शहरातील सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, जिथून ते मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत स्पर्धा करतील. गेल्या वर्षी पुण्यातील ४८ शाळांमधील ३१२ टीम्सनी यामध्ये भाग घेतला होता.

टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) सुदीप कुन्नुमल म्हणाले, “स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या २०२५ ग्लोबल एआय व्हायब्रन्सी टूलनुसार, भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगातील तिसरा सर्वात स्पर्धात्मक देश आहे. भारताच्या डिजिटल प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जग एआय-चालित भविष्याकडे वाटचाल करत असताना, आम्ही जगातील एक सर्वात मोठी एआय-आधारित तंत्रज्ञान सेवा इकोसिस्टिम उभारण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही इकोसिस्टिम नावीन्य, सर्वसमावेशकता आणि दीर्घकालीन मूल्याला चालना देईल. ‘टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२६’ सारख्या उपक्रमांद्वारे, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करणे आणि त्यांच्यातील प्रतिभेचे संगोपन करणे हे आमचे ध्येय आहे. तसेच, एआयच्या परिवर्तन घडवून आणण्याच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी आम्ही पुढील पिढीला सक्षम करू इच्छितो. या प्रयत्नांमुळे STEM चा पायाही मजबूत होईल, ज्यामुळे आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताला चालना मिळेल.”

‘टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२६’ हा भारतातील एक सर्वात प्रतिष्ठित आंतरशालेय प्रश्नमंजुषा मंच आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो आणि शिक्षक व पालकांकडूनही याला भक्कम पाठिंबा मिळतो. ही स्पर्धा टीसीएसच्या क्विझ आयोजित करण्याच्या दोन दशकांच्या परंपरेवर आधारित आहे, ज्याची सुरुवात १९९९ मध्ये ‘टीसीएस आयटी विझ’ (TCS IT Wiz) ने झाली. या २०२६ च्या आवृत्तीमध्ये शिक्षण, मनोरंजन आणि क्रीडा यांपासून ते व्यावसायिक ट्रेंड, जाहिरात आणि सोशल मीडियापर्यंत विविध विषयांचा समावेश असेल. STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) वर विशेष लक्ष केंद्रित करून, ही क्विझ कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कंप्युटिंग, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांवर प्रकाश टाकेल.

प्रवेशिका ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे. ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६’ वेबसाइटला भेट द्या. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.tcs.com/inquizitive

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading