दुसऱ्या ‘बिग हिट कॉर्पोरेट करंडक’ स्पर्धेत रियुनायटेड क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!
पुणे : रियुनायटेड क्रिकेट क्लब तर्फे आयोजित दुसऱ्या ‘बिग हिट कॉर्पोरेट करंडक’ स्पर्धेत तेजस चौधरी याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रियुनायटेड क्रिकेट क्लब संघाने व्हि-एड्ज क्रिकेट क्लबचा १३ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
हांडेवाडी येथील सनी इलेव्हन क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रियुनायटेड क्रिकेट क्लबने १९.२ षटकात १४६ धावांचे लक्ष्य उभे केले. निखील कदम (३१ धावा), शुभम सावंत (२८ धावा) आणि विश्वास कुमार (३२ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. व्हि-एड्ज संघाच्या शिवकुमार चुग याने १५ धावांत निम्मा संघ तंबुत पाठवला. या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हि-एड्ज संघाचा डाव २० षटकात १३३ धावांवर मर्यादित राहीला. प्रविण कुमार (४२ धावा), आकाश बेनकर (२१ धावा) आणि विजय कोहली (नाबाद २२ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. तेजस चौधरी याने १८ धावांत तीन गडी बाद केले. राहूल नाईक याने दोन गडी बाद केले आणि संघाचा विजय साकार केला.
विजेत्या रियुनायटेड क्रिकेट क्लब संघाला करंडक आणि एक लाख रूपयांचे पारितोषिक तर, व्हि-एड्ज क्रिकेट क्लबला करंडक आणि ६० हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
रियुनायटेड क्रिकेट क्लबः १९.२ षटकात १० गडी बाद १४६ धावा (निखील कदम ३१, शुभम सावंत २८, विश्वास कुमार ३२, शिवकुमार चुग ५-१५, आनंद दायमा २-१४, अजिंक्य यादव २-२१) वि.वि. व्हि-एड्जः २० षटकात ९ गडी बाद १३३ धावा (प्रविण कुमार ४२, आकाश बेनकर २१, विजय कोहली नाबाद २२, तेजस चौधरी ३-१८, राहूल नाईक २-२५); सामनावीरः तेजस चौधरी;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कष्ट खेळाडूः पीयुष गंगवार (युएफ क्रिकेट क्लब);
सर्वोत्कष्ट फलंदाजः कुणाल गुप्ता (साई स्पोर्ट्स क्लब);
सर्वोत्कष्ट गोलंदाजः आशितोष देशमुख (पुणे रेंजर्स क्लब);
सर्वोत्कष्ट क्षेत्ररक्षकः शुभम सावंत (रियुनायटेड क्रिकेट क्लब);
ऑरेंज कॅपः आकाश बेनकर (व्हि-एड्ज);
पर्पल कॅपः राहुल नाईक (रियुनायटेड क्रिकेट क्लब);
‘फेअर प्ले’ संघ पुरस्कारः ड्रिम्स् क्रिकेट क्लब;
