Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य? खासदार सुप्रिया सुळे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल. त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य?असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यावर माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या. 
माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

मी तीन चार वेळा तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये एक गोष्ट जावणली की, ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळच झाली आहे. दुसरी गोष्ट तिथे प्रचंड गर्दी होती. एवढी मोठी गर्दी असताना जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला बाजूला सारले, अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल. यामध्ये हा विनयभंग कसा होऊ शकतो असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

तरीसुद्धा त्या महिलेची बाजू आपण एकूण घेतली पाहिजे. पण पोलिस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार दाखल करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याच आपण सर्वांनी विचार केला पाहिजे .असे सुळे म्हणाल्या.

माझे वडील मुख्यमंत्री असताना मी मुंबईत बस आणि ट्रेनमधून फिरले आहे. मुंबईत बस आणि ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यावेळी धक्काधक्की होत असते. मोठी गर्दी असेल तर असा धक्का लागतो. मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच असल्याचे सुळे म्हणाल्या. माझं जितेंद्र आव्हाड यांच्याशी सकाळी बोलणं झालं असल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या .जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. हे नेमकं का केलं जातय? असे सुळे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading