देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 133 व्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण.
पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 133 व्या जयंती व बाल दीना निमित्त निमित्त नेहरू स्टेडियम येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते नेहरूजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लहान मुलांच्या सहित सर्वांनी ” पंडित जवाहरलाल नेहरू अमर रहे ” च्या घोषणा देऊन आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित नेते मंडळींच्या हस्ते सर्व बालचमूंना गुलाबाचे फुल व कॅडबरी देऊन बालदिन साजरा केला.
या प्रसंगी काँग्रेस चे जेष्ठ नेते उल्हास पवार, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, आबा बागुल, कमल व्यवहारे, श्रीकृष्ण बराटे, नरेंद्र व्यवहारे, आशिष व्यवहारे व अनेक काँग्रेस कार्यकर्ते व बालचमू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र व्यवहारे यांनी केले तर आभार आशिष व्यवहारे यांनी मानले.
