Sunday, June 21, 2026
Latest NewsSports

पीएमडीटीए-केपीआयटी-सोलींको  बाउंस टेनिस अकादमी कुमार  लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत सामायरा ठाकुर, रेयांश गुंड, रिषभ ए, देवेशी पाडिया यांना विजेतेपद 

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी, पीडब्लूसी व सोलींको  यांच्या संलग्नतेने आयोजित  8  व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील  पीएमडीटीए-केपीआयटी-सोलींको बाउंस टेनिस अकादमी कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत सामायरा ठाकुर, रेयांश गुंड, रिषभ ए, देवेशी पाडिया  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करुन विजेतेपद संपादन केले.
बाउन्स टेनिस अकादमी, लॉ कॉलेज रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित सामायरा ठाकुरने ईशना नायडूचा 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात अव्वल मानांकित रेयांश गुंड याने तिसऱ्या मानांकित विराज कुलकर्णीचा 7-3 असा पराभव करुन विजेतेपदाला गवसणी घातली.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत रिषभ ए याने चौथ्या मानांकित अद्वैत गुंडचा 7-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत देवेशी पाडियाने जान्हवी सावंतचा 7-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व  उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रकाश कुसाळकर, योगेश आहेर, सतीश झडपे, रवी कुसाळकर, श्रद्धा देशमुख, पूजा धनकुडे आणि स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 8 वर्षाखालील मुली:उपांत्य फेरी:
सामायरा ठाकुर(1) वि.वि.आहाना कोठारी 6-1;
ईशना नायडू वि.वि.सैफी झिया 6-4;
अंतिम फेरी: सामायरा ठाकुर(1) वि.वि.ईशना नायडू 7-5;
8 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
रेयांश गुंड(1) वि.वि.ओम भांडे(6) 6-3;
विराज कुलकर्णी(3)वि.वि.आदित्य उपाध्या 6-5(3);
अंतिम फेरी: रेयांश गुंड(1) वि.वि.विराज कुलकर्णी(3) 7-3;
10 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
रिषभ ए वि.वि.रेयांश गुंड(3) 6-3;
अद्वैत गुंड(4)वि.वि.विराज खानविलकर 6-3;
अंतिम फेरी: रिषभ ए वि.वि.अद्वैत गुंड(4) 7-1;
10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
जान्हवी सावंत वि.वि.सैफी झिया(1) 6-0;
देवेशी पाडिया वि.वि.सामायरा ठाकुर(2)6-4;
अंतिम फेरी: देवेशी पाडिया वि.वि.जान्हवी सावंत 7-1.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading