अनिरुद्ध गौतम – यांच्या रेस्टॉरंट फायनान्सिंगवर आधारित चर्चासत्राचे आयोजन
पुणे : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाज पुणे चॅप्टर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी अनिरुद्ध गौतम (एस. गौतम अँड असोसिएट्स एलएलपीचे वरिष्ठ भागीदार) यांच्यासोबत फायनान्सिंग वर आधारित एका महत्वपुर्ण चर्चासत्राचे आयोजन करणार असुन डॉटपे-संचालित हा कार्यक्रम ‘ रेस्टॉरंट फायनान्स ३६० ‘ वन लाउंज, कोरेगाव पार्क येथे सायंकाळी ७ वाजता होईल.
बाणेर, पुणे- भाजी पाला येथील व्हेगन लाइफस्टाइल किचन अँड बारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या त्यांच्या सदस्यांसाठीच्या पहिल्या विशेष कार्यक्रमानंतर एनआरएआय पुणे चॅप्टर पुन्हा एकदा नॉलेज शेअरिंग सेशनद्वारे परतले आहे. एनआरएआयने आजतगायत आदरतिथ्य (अन्न व पेय) क्षेत्रातील असंख्य व्यवसायांना मदत केली आहे, आणि या खास चर्चासत्राद्वारे ते या उद्योगातील व्यवसायीकांना वित्त आणि व्यवस्थापनासाठी देखील मार्गदर्शन करतील. अनिरुद्ध गौतम या खास आयोजनामध्ये उपस्थित रेस्टॉरंट्स व ब्रँड्सला त्यांचे आर्थिक व्यवहार कसे हाताळावेत याविषयी मूलभूत मार्गदर्शन देतील आणि सर्व मालकांनी कश्या प्रकारे जागरूक असले पाहिजे या महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयावर प्रकाश टाकतील. सेटअप कॉस्ट मॅनेजमेंट, कंप्लायन्स इत्यादी गुंतागुंतीच्या व्यावसायिक पैलूंबद्दल ते एफ अॅण्ड बी ब्रँड्सवर लक्ष केंद्रित करून आणि उपस्थीतांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.
श्रीजित रवींद्रन (एनआरएआय पुणे उपसमितीचे सदस्य पिंपळे सौदागर) म्हणतात की, “अणेकदा वाईट आर्थिक स्थितीमुळे चांगले व्यवसाय अयशस्वी होतात म्हणुनच एनआरएआय ने वित्त व्यवस्थापन कसे करावे यावर प्रकाश टाकणे गरजेचे समजले आहे. जेणेकरून आम्हा सर्व व्यवसायीकांना आमचे व्यवसाय वाढवण्यात मदत मिळेल. आपल्यापैकी कोणीही हे सत्र चुकवू नये, कारण अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही मी अशा सत्रांमधून नेहमीच काहीतरी नवीन शिकतो. ” एनआरएआय पुणे चॅप्टरमध्ये प्रफुल्ल चंदावरकर ( मलाका स्पाईसचे मालक) ,केविन टेलीस (टॉईट), सिद्धार्थ महाडिक (ले प्लासिर), कुणाल म्हस्के (पेंटहाऊज) आणि निकी रामनानी (द डेली ऑल डे) यांच्यासह पुण्यातील इतर प्रमुख रेस्टॉरंटर्सचाही समावेश आहे. एनआरएआए ही देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये चॅप्टरच्या स्वरूपात अस्तित्वात असलेली संस्था आहे, जी ५,००,००० हून अधिक रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांना त्यांचे ब्रँड आणि व्यवसाय एकत्रितपणे वाढविण्यात मदत करते. त्याचप्रमाणे, एनआरएआय पुणे चॅप्टर सदस्यत्वाचा विस्तार करून , अतिथींना शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी देऊन शहरात अद्वितीय समुदाय निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.
