भारत जोडो यात्रेच्या इतिहासाचे साक्षीदार होणार – रोहन सुरवसे पाटील
पुणे: देशभरात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचे राज्यात ७ नोव्हेंबरला आगमन होणार असून या यात्रेत हजारोंच्या संख्येने सामील होऊन तमाम युवा वर्ग भारत जोडो यात्रेच्या इतिहासाचे साक्षीदार होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.गेली ५३ दिवस सुरू असलेली यात्रा केरळ,तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगणा,या राज्यांतून ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येत आहे.या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.राज्यातील युवा वर्ग या यात्रेत सहभागी होऊन या इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत .काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध प्रश्न घेऊन भारत जोडो यात्रेतून जनतेशी संवाद साधत आहेत.महागाई, बेरोजगारी,शेतकरी, कामगार वर्ग, गोरगरीब जनतेच्या समस्या अशा विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत.त्यांना साथ देण्यासाठी राज्यातील युवा वर्गाने या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन या यात्रेच्या इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.
