भारतीय प्रेक्षकांसाठी जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पॅरिमॅच चा नवीन शैक्षणिक प्रकल्प सुरू
पुणे : पॅरिमॅच आपला नवा प्रकल्प सुरू करण्यास अत्यंत उत्साहात आहे. ही शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकांची शृंखला असून भारतातील गेमिंगबद्दलचे समज बदलण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. पीएमआय ही एक सेवा कंपनी आहे. आफ्रिका, आशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेत पॅरिमॅच ब्रँड विकसित करण्यासाठी ते कार्यरत आहेत. जबाबदार गेमिंगच्या तत्वांना पाठिंबा देण्यासाठीच्या जागतिक पातळीवरील धोरणांचा एक भाग म्हणजे हा उपक्रम आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पहिली आवृत्ती क्रिकेट गेमिंगला समर्पित आहे.
या शरद ऋतूमध्ये त्यांनी (क्रिकेटचा पुरेपूर आनंद कसा मिळवावा : ही ७ गुपिते तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील) ही मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. क्रिकेट प्रो मास्टर्स होण्यास इच्छुक असलेल्या सर्वांनी ही मार्गदर्शक पुस्तिका वाचलीच पाहिजे.
या मार्गदर्शक पुस्तिकेत सामन्यातील कामगिरी वा निष्पत्तीवर परिणाम करू शकणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मैदानावरील परिस्थिती, प्रत्यक्ष सामन्यात घडणाऱ्या घडामोडी, खेळाडूंचे मानांकन, प्रतिकूल हवामान इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे योग्य बुकमेकर कसा निवडावा, प्रि-मॅच (सामन्यापूर्वी) विश्लेषण कसे करावे, गेमिंगचे विविधीकरण करून जोखीम कशा प्रकारे विभागावी अशा अनेक घटकांबाबत या ईबुकमध्ये शिफारसी दिलेल्या आहेत.
पॅरिमॅचतर्फे भारतीय व जगभरातील प्रेक्षकांसाठी जबाबदार गेमिंगच्या तत्वांचा प्रसार करण्यात येतो आणि हा शैक्षणिक उपक्रम याच धोरणाचा एक भाग आहे. या ईबुकमध्ये दिलेल्या शिफारसी या खेळणाऱ्याची जोखीम करण्याच्या दृष्टीने दिलेल्या आहेत, जेणेकरून आयगेमिंगचा अनुभव अधिक यशस्वी आणि आनंददायी होऊ शकेल.
पीएमआयचे चीफ कमर्शिअल ऑफिसर दिमित्री बेलिअॅनिन म्हणाले. की, आय गेमिंग हा एक प्रकारचा विरंगुळा आहे. याला समृद्धीचा मार्ग समजणे हे खेळणाऱ्यांचे प्राथमिक उद्दिष्ट नसावे. युझर्ससाठी क्रिकेट गेमिंग हा एक छंद असावा आणि फक्त सकारात्मक भावना निर्माण व्हाव्या अशी आमची धारणा आहे. म्हणूनच पॅरिमॅचतर्फे जबाबदार गेमिंगच्या तत्वांचा प्रसार करण्यात येतो, ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या सोबत असतात आणि खेळणाऱ्यांनी त्यांचे पालन करावे यासाठी प्रोत्साहन देतात.
या मार्गदर्शक पुस्तिकेत शिक्षण आणि मनोरंजन यांची सांगड घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक सल्ला देण्यात आला आहे, यात क्रिकेटबद्दल विलक्षण गोष्टी आहेत आणि या खेळाबद्दल प्रसिद्ध व्यक्तींची प्रेरणादायक विधानेही समाविष्ट आहेत.
या मार्गदर्शक पुस्तिकेत मौल्यवान तपशीलांचा खजिना आहे आणि हे वाचायला जास्तीत जास्त १५ मिनिटे लागतील. कारण यातील माहिती थोडक्यात आणि नेमकी दिली आहे. ही मोफत आहे आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या लिंकवरून ते डाऊनलोड करू शकता.
