Saturday, August 29, 2026
BusinessLatest News

सोनालिकाची ऑक्टोबर २०२२ मध्ये २०,००० ट्रॅक्टरच्या डिलिव्हरीची नोंद

पुणे  :  भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने एका नव्या जोमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील भारताच्या सर्वात मोठ्या उत्सवात उल्लेखनीय यश मिळविले आहे. कंपनीने या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी २०,०००  ट्रॅक्टरच्या डिलिव्हरीची नोंद केली असून बिलिंगमध्ये १६ टक्के वाढ केली आहे. या उद्योगाच्या अंदाजे ७ टक्के वाढीपेक्षा ही जवळपास दुप्पट वाढ आहे. ट्रॅक्टर उद्योगाच्या बाजारपेठेला नवरात्रीपासून गती मिळाली आणि ती ऑक्टोबरमध्येविशेषतः या महिन्यातील दिवाळीतहीसकारात्मक राहिली.

भारताच्या आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने आपल्या हेवी ड्यूटी धमाका मोहिमेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या ऑफर ग्राहकांना देऊ केल्या होत्या. शेतकऱ्यांनी या ऑफरचा सर्वाधिक फायदा घेतला.

या नव्या कामगिरीविषयी मत व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले,की आमची धोरणे आणि व्यावसायिक पुनर्रचनेच्या उपक्रमांमुळे आर्थिक वर्ष २०२२ -२३ मधील उत्सवाचा हंगाम आमच्यासाठी भरघोस यश देणारा ठरला. शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न पुढील अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर पाढविणारी नवी उत्साहवर्धक उत्पादने आम्ही सादर करत राहू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading