Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘तू चाल पुढं’ ही मालिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे : आदित्य वैद्य

झी मराठी वाहिनीवर ‘तू चाल पुढं’  ही मालिका १५ ऑगस्ट, संध्या.  ०७ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली. ह्या मालिकेत अभिनेता आदित्य वैद्य आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. आदित्यच्या अभिनयाची कारकीर्द  १९९८ पासून सुरु केली. त्या नंतर त्याने अनेक मालिका केल्या. या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, ‘तू चाल पुढं’ ही मालिका  मला 8 वर्षांच्या गॅपनंतर मिळाली, सोबतच झी मराठी सारख्या मोठ्या वाहिनीसोबत  काम करण्याची संधी मिळाली आणि ही भावना सुंदर व आनंदायी आहे. या मालिकेतील माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, मी श्रेयस वाघमारे ही भूमिका या मालिकेत साकारत आहे. श्रेयस या पात्राच्या मालिकेत अनेक छटा आहेत. श्रेयस स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहतो, आणि घरासाठी धडपडत असताना, तो आपल्या बायकोशी कधी अहंकारी असतो तर कधी प्रेमळ असतो. हे पात्र साकारताना मला खूप शिकता आलं आणि ही भूमिका साकारताना फार मज्जा येते. या भूमिकेसाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी भूमिका नक्की आवडतेय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading