सुकांत कदम जागतिक पॅरा बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत
पुणे ः जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या सुकांत कदम याने जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेच्या एसएल-४ विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
टोक्यो येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे खेळ करताना सुकांतने सिंगापूरच्या अनुभवी ची हिऑंग अन्ग याचा २१-१०, २१-१५ असा पराभव केला.
सुकांतने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. सुकांतने केवळ २४ मिनिटांत विजय मिळविला. ची हिआँगविरुद्ध जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता. माझी सुरुवातच चांगली झाली. त्याला वर्चस्व राखण्याची संधी उपलब्ध करुन द्यायची नाही आणि विजय मिळवायचा हेच माझे उद्दिष्ट होते, असे सुकांत म्हणाला.
उपांत्य फेरीत सुकांतसमोर आता जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या फ्रेडी सेटिआवानचे आव्हान असेल.
निकाल:
सुकांत कदम वि.वि. ची हिआँग अन्ग २१-१० २१-१५
