Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन

पुणे:  विधानभवनामध्ये एक पत्रकार महिला मनोहर भिडे यांच्याशी बोलायला गेली असता ‘पोरी पहिल कुंकू लाव नंतर माझ्याशी बोल’ असे बोलून तिला हुसकवून लावले आणि कुंकू का लावायचे असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. काही सामाजिक संस्थां आक्रमक झाल्या आहेत. आज पुण्यात संभाजी भिडे यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनाला माजी महापौर कमल व्यपवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्हा्ळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, 
संगीता तिवारी म्हणाल्या, ंआज आपला महाराष्ट्र शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. माँ जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, इंदिरा गांधी यांनी कुंकू न लावता आपले सामर्थ्य या देशात सिध्द केले आहे. अतंराळविर कल्पना चावला हिने ही कुंकू न लावता आपल सामर्थ्य सिध्द केले होते. आम्ही महिलांनी कुंकू लावावे का नाही हा आमचा निर्णय आणि आमचा हक्क आहे. देशामध्ये लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आपण स्वत: आपले निर्णय घेवू शकतो. मनोहर भिडेंनी आम्हाला संस्कारांचे शिक्षण देऊ नये.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading