५० खोक्यांवरून राज्यात सामान्य माणसांना शंका आहे -खासदार सुप्रिया सुळे
पुणे: आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात येण्याचं नाव घेत नाही. राणा यांनी बच्चू कडूंवर सरकार स्थापनेवेळी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पुरावे देण्याचं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे.बच्चू कडू हे संवेदनशील नेते आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल आहे. ५० खोक्यांवरून राज्यात सामान्य माणसांना शंका आहे. अशा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गावोगावी तीच चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. बच्चू कडू याचं काम मोठ आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.अशीही मागणी सुळे यांनी केली आहे.
अनेक नेते आमच्या महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, परंतु यातील अनेक नेते राज्यातील कुठल्या ना कुठल्या पक्षात होते असे सुळे म्हणाल्या. आता हे नेते नैतिकेच्या गोष्टी करत आहेत. अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा कुणाला काहीच अडचण नव्हती. परंतु ज्या हातांनी आपल्याला भरवलं त्या हाताचा चावा घेणे मला चुकीचे वाटते. जर आपले मतभेद झाले तर मी माझा वेगळा मार्ग चोखाळेन परंतु असे करणे चुकीचे आहे. माझे बाबा शरद पवार यांचेही काँग्रेस नेत्यांसोबत मतभेद झाले तेव्हा त्यांनी स्वतःचा मार्ग निवडत पक्ष स्थापन केला असेही सुळे म्हणाल्या.
