Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिवाळी फराळ निमित्ताने सर्व पक्षांचे नेते राजकीय
मतभेद विसरून एकत्र

पुणे : दिवाळी फराळ निमित्तानं आज पुण्यातील सर्वपक्षीय आमदार आणि नेते वाडेश्वर कट्ट्यावर भेटले.खेळीमेळीच्या वातावरणात दोन तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत एकमेकांना चिमटे काढत विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी गुरूवारी वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय नेत्यांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आम आदमी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, मनसेचे किशोर शिंदे, भाजपचे शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक विशाल धनवडे, सचिन दोडके, गोपाळ चिंतल यांच्यासह संयोजक अंकुश काकडे, श्रीकंत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, रवी चौधरी यावेळी उपस्थित होते.
काही महिन्यांपासून राज्यातल राजकीय परिस्थिती बदललेली आहे. सामान्य माणूस ह्या सगळ्या परिस्थिती कडे दुःखद आणि लाजिरवाणी स्थिती अश्या दृष्टीने बघत आहे. मात्र पुण्याची राजकीय संस्कृती खेळीमेळीची, टीका टिप्पणी करतानाही पातळी घसरणार नाही याची काळजी घेणारी, मतभेद होत असताना मनभेद होऊ नये हे दर्शवणारी, विरोध करताना सुद्धा तोल ढळता कामा नये याची जाणीव असणारी असल्याचे राजकीय फराळाच्या निमित्ताने दिसून आले. पण

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading