हम बेवफा हरगीज ना थे,पर हम वफा कर ना सके चिन्ह गोठवण्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
पुणे: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अशातच आरोप प्रत्यारोप होत असतानाच आपण दोन गोष्टी बघू शकतो. एक म्हणजे शिवसेनेवर हा अन्याय झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध हे सर्व कटकारस्थान झालं आहे. सगळं चित्र पाहता मला एक गाणं आठवत, हम बेवफा हरगीज ना थे,पर हम वफा कर ना सके. अशी घटना अगोदरही झाली आहे. पण मला शिंदे गटाची काळजी वाटते त्यांच्यासाठीच मला हे गाणं आठवत अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना टीका केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नडा यांनी छोटे पक्ष संपतील फक्त देशात भाजपच राहील. असे वक्तव्य केले होते.अशा गोष्टींनी पक्ष संपत नसतात, राष्ट्रवादी कॉग्रेस पण 2019 ला संपली असं म्हणत होते.पण असे पक्ष संपत नसतात. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी जेपी नडा यांच्यावर केली.
देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे बोलतात ते सगळंच खर नसतं. पक्ष बदलल्यावर अस बोललं जातं. राष्ट्रवादीवर आरोप केल जातात. उपमुख्यमंत्री यांना विचारा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाहीत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं त्यावरती सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, माझ्यावर संस्कार झाले आहेत, त्यात आई वडील आदर स्थान आहेत माझ्या आई वडिलांनी अस शिकवलं नाही असं सुळे म्हणाल्या आहेत. अतिथी देवो भव, आमचा एक पक्ष एक विचार असं नाही, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालतो असंही त्या पुढे बोलताना म्हणाल्या आहेत.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. हा निर्णय फक्त अंधेरी विधानसभेच्या पोट सभा निवडणुकीपर्यंत आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. मुंबई निवडणूक आता भाजप कमळावर लढवणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
