fbpx

चित्रपटाची भाषा ही उत्तम संस्कार करणारी समृद्ध भाषा – मोहन आगाशे

पुणे : द डार्क शाडो मोशन पिक्चर्स आणि फिल्म फेस्टिवल संस्थेच्या वतीने मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात वूंग – वूंग लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. रोख रक्कम २१ हजार रुपये सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर अनिता लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकवला ११ रक्कम हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सापशिडी लघुपटाने तृतीय क्रमांक पटकावला. ७ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देण्यात आले. त्याचबरोबर विविध विभागातील तंत्रज्ञ आणि कलाकार यांना देखील रोख बक्षीसे देण्यात आली. अशी माहिती मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी दिली.

या प्रसंगी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन आगाशे, अभिनेत्री तेजा देवकर, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेता हंसराज जगताप, अभिषेक अवचार, दिग्दर्शक अमर देवकर, शंकर धोत्रे, दत्ता गुंड, जय भोसले आदी मान्यवर उपस्थित होती.

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नाटक हे शब्दांचे माध्यम तर चित्रपट हे दृक्श्राव्य माध्यम आहे. आजच्या तरुण पिढीचा मला सार्थ अभिमान असून त्यांच्यावर माझा शंभर नव्हे एक लाख टक्के विश्वास आहे. भारतीय चित्रपट तरुण पिढीच्या हातात पडल्यानंतर अजून तो गगनभरारी घेईल. चित्रपट मनोरंजन क्षेत्रामध्ये तरुणांना करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर करिअर म्हणून तरुणांनी बघावे.

चित्रपट ही करमणुकीची भाषा नसून आपल्या सर्वांचा गैरसमज झाला आहे. चित्रपट म्हणजे करमणूक पाठपुस्तक म्हणजे शिक्षण असे नसून चित्रपटाची भाषा ही उत्तम संस्कार करणारी समृद्ध भाषा आहे. म्हणून ही भाषा सक्रियपणे शिका, डोळसपणे बघा आणि कान देऊन ऐका. या भाषेत प्रत्येकाला समृद्ध व्हायचं असेल चांगले चित्रपट, लघुपट बघणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक अवचार यांनी केले तर रामकुमार शेडगे यांनी आभार व्यक्त केले.

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी – दिग्दर्शक रामकुमार शेडगे

पुण्यात मोठ्या दिमाखात दोन दिवसीय महोत्सवात चार पडला. या महोत्सवाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. सिनेसृष्टीतील भूत-वर्तमान-भविष्य काळातील महत्वपूर्ण विषयसंबंधित विविध चर्चा तसेच चित्रपटसृष्टीतील जेष्ठांचे मार्गदर्शन लाभले होते. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी.

Leave a Reply

%d bloggers like this: