fbpx

उद्धव ठाकरेंच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: काल मुंबई त दसरा मेळावा शिवसेनेचा व शिंदे गटाचा पार पडला. खरी शिवसेना कोणाची हे उद्धव ठाकरेंनी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना व कार्यकर्त्यांना पटवून दिले. त्यावर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकले.शिंदेंनी दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. उद्धव ठाकरेंचे पण भाषण ऐकले.भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं. आणि बीकेसी मध्ये प्रचंड गर्दी होती.अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यात पत्रकाराशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बालेवाडी येथे नैसर्गिक शेती राज्य सर्व परिषद कार्यक्रमात उपस्थिती लावली. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दसरा मेळाव्यात भाजपची Script वाचत होते अशी टीका विरोधकांनी केली आहे.Script भाजप ची म्हणणाऱ्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेवर आम्ही नक्कीच भगवा फडकवणार. अजित पवार आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणालेबारकाईने विचार करून राज्यातील जनतेने पुढची भूमिका घेतली पाहिजे. कोणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे. याचा विचार करावा असे पवार म्हणाले.अजित पवार काय म्हणाले मला माहित नाही. पण मूळ सेनेचा विचार बाजूला टाकला सावरकरांवर. पण तो भाजप चा असे प्रतिउत्तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या भाषणावर फडणवीस म्हणाले,शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून भाषण केले. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: