fbpx

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे: अजिंक्य ननावरे

झी मराठी वाहिनीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही  मालिका रात्री  १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अजिंक्य ननावरेने यापूर्वी नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला की, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका मनोरंजन क्षेत्रातील माझी पहिलीच मालिका आहे आणि ती करताना मला खूप आनंद होत आहे. तसेच या मालिकेबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, मी अद्वैत नावाची भूमिका या मालिकेत साकारत आहे. शिक्षणासाठी तो घरापासून दूर गेला होता. तो परत आल्याने त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विशेष आसक्ती निर्माण झाली आहे. आणि मालिकेबद्दल बोलायचं झाल तर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’  ही कथा खूप रंजक आहे कारण प्रत्येक एपिसोड मध्ये  एक नवीन  गोष्ट घेऊन पुढे जाते. मला ही भूमिका करताना खूप मज्जा येतेय, मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे आणि आशा करतो की प्रेक्षक या मालिकेवर त्यांचे प्रेम कायम ठेवतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: