fbpx

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्न पूर्तीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबादेवीने आशीर्वाद द्यावेत : . डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विजयादशमी निमित्त ,काल मुंबादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून आज शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्न पूर्तीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना मुंबादेवी आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच राज्यातील साडे तीन शक्ती पीठाची दर्शन करून आलेली बये दार उघड मोहीम आज मुंबईत दाखल झाल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या समवेत स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी युगंधरा साळेकर, उज्ज्वला पेटकर, कल्पना भांबुरे, संजीवनी मानकर, अभिजीत गुरव, तेजस इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: