Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

सेलेब्रल पाल्सीग्रस्तांना स्वावलंबी बनवा – मानसोपचार तज्ज्ञ किरण कुरणे

पुणे : सेलेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असून त्यांना स्वावलंबी बनविले पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ किरण कुरणे यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये जागतिक सेलेब्रल पाल्सी दिनानिमित्त (6 ऑक्टोबर) आयोजित चर्चासत्रात कुरणे बोलत होत्या.

नियमित व्यायाम आणि योग्य उपचार केल्याने रुग्णांच्या तब्येतीत खूप लवकर सुधारणा होते असे डॉ. अतिया शेख यांनी सांगितले. या मुलांना वाढविण्याचे आव्हान स्वीकारून, या आजाराकडे सकारात्मकतेने पाहावे, असे मत सहभागी पालकांनी व्यक्त केले. यावेळी काही रुग्णांनी अनुभव कथन केले.

महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी यांनी स्वागत केले. उमा शर्मा यांनी सूत्रसंचालन आणि जान्हवी मांजरेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading