fbpx

पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत समायरा ठाकूर, रेयांश  गुंड, अद्वैत गुंड, ओवी मारणे यांना विजेतेपद 

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार  लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत समायरा ठाकूर, रेयांश  गुंड, ओवी मारणे व अद्वैत गुंड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
 
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात चौथ्या मानांकित समायरा ठाकूरने झेन गुप्ताचा  7-6(4) असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात रेयांश गुंडने शितिज प्रसादचा 7-1 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. रेयांश हा एसएस इंग्लिश मिडियम स्कूल येथे दुसरी इयत्तेत शिकत असून इंटेंसिटी टेनिस अकादमी प्रशिक्षक अतूल देवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित अद्वैत गुंडने अव्वल मानांकित सोहम रणसुभेचा 7-2 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.   अद्वैत हा बाल शिक्षण मंदिर येथे पाचवी इयत्तेत शिकत असून व मिलेनियम स्कूल येथे प्रशिक्षक फैजल अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात अंतिम लढतीत ओवी मारणे हिने नक्षत्रा अय्यरचा 7-4 असा पाराभव करत विजेतेपद पटकावले. ओवी ही मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून अक्षय शहाणे टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक मिलिंद मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर, स्पर्धा निरिक्षक तेजल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य  फेरी: 8 वर्षाखालील मुली:
झेन गुप्ता वि.वि अकिरा मुदुमदिग्डा 6-3
समायरा ठाकूर (4)वि.वि इश्ना नायडू (6) 6-2
अंतिम फेरी :  समायरा ठाकूर (4)वि.वि झेन गुप्ता 7-6(4)
8 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी: रेयांश गुंड वि.वि शितिज प्रसाद 7-1
10 वर्षांखालील मुले: उपांत्य  फेरी
सोहम रणसूभे(1) वि.वि अहान भट्टाचार्य (4) 6-3
अद्वैत गुंड(5) वि.वि अश्वथ भुजबळ (2) 6-4
अंतिम फेरी: अद्वैत गुंड(5) वि.वि सोहम रणसूभे(1) 7-2
 
10 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी
नक्षत्रा अय्यर वि.वि रुद्रमा चौहान 6-1
ओवी मारणे वि.वि ऋषिता यादव 6-1
अंतिम फेरी
ओवी मारणे वि.वि नक्षत्रा अय्यर 7-4

14 वर्षांखालील मुले: तिसरी फेरी:
तनिष्क देवरे वि.वि आयनेश पाचघरे 6-0
रचित शर्मा वि.वि वेदांत झेपे 6-3
नमिश हुड वि.वि सिद्धार्थ साहू 6-0
सय्यम पाटील वि.वि गौरव कदम 6-0
आदित्य योगी वि.वि रणवीर गुंड 6-1
सक्षम भन्साळी वि.वि अथर्व यलभर 6-3
स्वर्णिम येवलेकर वि.वि अदित अग्रवाल 6-0. 

Leave a Reply

%d bloggers like this: