fbpx

‘महिंद्रा’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे सप्टेंबर २०२२मध्ये ४७१०० ट्रॅक्टर्सची विक्री

मुंबई  : महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने (एफईएस) आज सप्टेंबर २०२२ मधील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली.  सप्टेंबर २०२२ मध्ये ‘महिंद्रा’च्या ट्रॅक्टर्सची देशांतर्गत विक्री ४७१०० युनिट्स इतकी झाली, जी सप्टेंबर २०२१ मध्ये ३९०५३ युनिट्स होती. सप्टेंबर २०२२ मध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत + निर्यात) ४८७१३ युनिट्स झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीत ती ४०३३१ युनिट्स होती. या महिन्यात १६१३ युनिट्सची निर्यात झाली.

या कामगिरीबद्दल माहिती देताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही सप्टेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत बाजारात ४७१०० ट्रॅक्टर विकले आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही २१ टक्क्यांची वाढ आहे. एका महिन्यात झालेली आतापर्यंतची आमची ही सर्वात जास्त विक्री आहे. सणासुदीमुळे या महिन्यात मागणी चांगली होती. ऑक्टोबरमध्येही ती अशीच कायम राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. खरिपाच्या पिकांची कापणी लवकरच सुरू होत असल्याने आणि पिकांच्या किमती स्थिर राहिल्याने लोकांची भावना सकारात्मक आहे. यंदा मान्सूनही सामान्य पातळीपेक्षा जास्त झाल्याने देशभरातील जलाशयांच्या पातळीत सुधारणा आहे, जमिनीत आर्द्रता वाढली आहे आणि ही परिस्थिती आगामी रब्बी हंगामासाठी खूप सकारात्मक आहे. निर्यातीच्या बाजारपेठेत आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १६१३ ट्रॅक्टर विकले आहेत. ही वाढ २६ टक्के इतकी आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: