fbpx

आयसीआयसीआय बँक युके पीएलसीद्वारे इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी बँक खाते सुविधा उपलब्ध

मुंबई – आयसीआयसीआय बँक युके पीएलसी या आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी राहात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ‘होमव्हांटेज करंट अकाउंट (एचव्हीसीए)’ ही खाते सुविधा मिळणार आहे. इंग्लंडमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही सुविधा खास तयार करण्यात आली आहे. या खात्यावर व्हिसा डेबिट कार्ड मिळणार असून ते जगभरात कुठेही वापरता येईल.

विद्यार्थ्यांना भारतातच असतान डिजिटल पातळीवरून आणि तत्काळ हे खाते सुरू करता येईल व ते भारतातीच बचत खात्याप्रमाणे असेल. त्यांना आयसीआयसीआय बँकेच्या शाखेला भेट न देताही आयसीआयसीआय बँक युके आयमोबाइल अप किंवा ऑनलाइन पातळीवरून हे खाते सुरू करता येईल. एकदा हे खाते सुरू केल्यानंतर त्यांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि डेबिट कार्ड सक्रिय करता येईल. हे डेबिट कार्ड त्यांच्या पसंतीप्रमाणे भारत किंवा इंग्लंडमधील पत्त्यावर पाठवले जाईल.

आयसीआयसीआय बँक इंडियाने इंग्लंडमध्ये स्थलांतरित होत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा उभी केली असून त्याअंतर्गत त्यांच्या बँकिंगविषयक गरजा पूर्ण केल्या जातील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, प्रवासी कार्ड, बँक खाते आणि इंग्लंड किंवा भारतात पैसे पाठवणे इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत.

आयसीआयसीआय बँक युके पीएलसीच्या रिटेल विभागाचे प्रमुख श्री. प्रताप सिंग म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँक युकेद्वारे गेल्या दशकभरापासून भारतीय समाजाला विविध प्रकारच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट बँकिंग सेवा दिल्या जात आहेत. इंग्लंडमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बँकिंग सेवांची आम्हाला जाण आहे आणि त्यांच्यासाठी बँकिंग सुलभ बनवण्याचे आमचे ध्येय आहे. भारतात असतानाच डिजिटल पातळीवरून खाते सुरू करण्याच्या या सुविधेमुळे भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये आल्यानंतर पुढची प्रक्रिया सोपी होते. होमव्हांटेज करंट अकाउंट आणि व्हिसा डेबिट कार्डामुळे इंग्लंडमधील त्यांच्या दैनंदिन बँकिंग गरजांची काळजी घेतली जाते. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या बँकिंगविषयक गरजा, तर भारतातील त्यांच्या पालकांच्या परदेशातील बँकिंग गरजा सोप्या, सोयीस्कर व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

होमव्हांटेज करंट अकाउंटची महत्त्वाची वैशिष्ट्ये –

  • पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया – विद्यार्थ्यांना भारतातून किंवा इंग्लंडमध्ये ऑनलाइन पातळीवरून बँक खाते सुरू करता येईल आणि खात्याची तपशीलवार माहिती तत्काळ मिळवता येईल.
  • मोफत डेबिट कार्ड – विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या भारत किंवा इंग्लंडमधील पत्त्यावर व्हिसा डेबिट कार्ड पाठवले जाईल.
  • 24/7 उपलब्ध – डिजिटल पातळीवर खाते सुरू करण्याची आणि वापरण्याची सुविधा 24/7 वापरता येईल.

होमव्हांटेज करंट खाते सुरू करण्याठी तीन सोप्या पायऱ्यांद्वारे अर्ज करता येईल व ते सक्रिय करता येईल.

  1. मोबाइल अप किंवा संकेतस्थळाद्वारे अर्ज करा. अर्जदारांना भारतात किंवा युके अप स्टोअरमधून आयसीआयसीआय बँक आयमोबाइल अप डाउनलोड करता येईल किंवा www.icicibank.co.uk. ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.
  2. अर्ज दाखल करणे – ऑनलाइन अर्ज करा, मूळ पासपोर्ट (भारतीय किंवा ब्रिटिश) स्कॅन करा आणि अर्ज दाखल करा. खाते तत्काळ सुरू होईल.*
  3. इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सक्रिय करा – खाते सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सक्रिय करता येईल. दिलेल्या पत्त्यावर काही दिवसांत डेबिट कार्ड येईल, जे विद्यार्थी भारतात असतानाही सक्रिय करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: