fbpx

एफआयएफएसतर्फे स्पाइस फँटसीचे स्टार्ट- अप सदस्य म्हणून स्वागत

पुणे : एफआयएफएसला स्पाइस फँटसी या उदयोन्मुख फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मचे आपल्या स्टार्ट- अप विभागाचे सदस्य म्हणून स्वागत करताना अभिमान वाटत आहे. जियाटेक सोल्यूशन्स प्रा. लि. च्या स्पाइस फँटसीद्वारे फँटसी, फुटबॉल, कबड्डी आणि इतर खेळ उपलब्ध करून दिले जातात. भारतीय फँटसी स्पोर्ट्स क्षेत्र २०२४ च्या अखेरपर्यंत ३२ टक्के सीएजीआर दराने विस्तारेल असा अंदाज असून त्याची उलाढाल ३.७ अब्ज डॉलर्स असेल असा अंदाज आहे. फँटसी स्पोर्ट्स क्षेत्रात भारत १५ कोटी युजर्ससह जगातील सर्वात मोठा देश म्हणून उदयास आला आहे.

विश्वास, न्याय्य व्यवहार आणि गुप्तता ही स्पाइस फँटसीची मार्गदर्शक तत्वे आहेत. जियाटेक सोल्यूशन्स प्रा. लिमिटेड ही मोबाइलओआयडी२ टेक्नोलॉजीजची ऑफ- शूट असून तिच्या ग्राहकांमध्ये एरिकसन, मायक्रोसॉफ्ट, नोकिया, एटिसॅलट, पीडब्ल्यूसी आणि आयआयटी दिल्ली यांचा समावेश होतो. तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जियाटेक सोल्यूशन्सने आपल्या ग्राहकांना अधिक सुरक्षितपणे व्यवहार करण्यासाठी आवश्यक पेमेंट सुविधा पुरवल्या आहेत.

‘गेल्या काही वर्षांत फँटसी स्पोर्ट्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या क्षेत्रात प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. एफआयएफएसच्या सहकार्याने पुढे प्रगती करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे जियाटेक सोल्यूशन्सचे संस्थापक आणि संचालक  गौरव श्रीवास्तव म्हणाले.

‘मी स्पाइस फँटसीचे एफआयएफएस कुटुंबात स्वागत करतोआगामी क्रीडा हंगामात त्यांच्या यशासाठी मी उत्सुक आहे. एफआयएफएसमध्ये आम्ही स्वयं- नियमनाच्या तत्वावर लक्ष केंद्रित करतो आणि भारताच्या आर्थिक विकासासाठी योगदान देण्यासाठी तसेच दमदार विकास साध्य करण्यासाठी इंडस्ट्री ऑपरेटर्ससह काम करतो, असे एफआयएफएसचे संचालक जनरल जॉय भट्टाचार्य म्हणाले.

एक सदस्य या नात्याने स्पाइस फँटसी एफआयएफएस चार्टरच्या फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवण्यासाठीच्या स्वयं- नियमन पद्धतींचे पालन करेल. फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्सने (एफआयएफएस) नाविन्यास चालना देत फँटसी स्पोर्ट्स उद्योगाचा जबाबदार विकास घडवण्यासाठी नुकतीच चार्टरची पुनर्रचना आणि बळकटीकरण केले.

नव्या चार्टरमध्ये फँटसी स्पोर्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटी (एफएसआरए) या स्वतंत्र, स्वयं- नियमनाच्या माध्यमातून फँटसी स्पोर्ट्स क्षेत्रात सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करण्यासाठी बांधील असलेल्या संघटनेच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे. एफएसआरएमध्ये तीन माजी न्यायाधींशांचा समावेश आहे. जस्टिस (निवृत्त) मुकुल मुद्गल, माजीमुख्य न्यायाधीश, माननीय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय आणि जस्टिस (निवृत्त) जी. एस. सिस्तानी, माजी न्यायाधीश, माननीय दिल्ली उच्च न्यायालय फँटसी स्पोर्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटीचे (एफएसआरए) पॅनेल सदस्य आहेत. प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, जस्टिस(निवृत्त) ए. के. सिकरी, माजी न्यायाधीश, माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे एफएसआरएचे अध्यक्ष आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: