fbpx

पुण्यात चांदणी चौकातील पूलाची चर्चा तात्या म्हणतात,भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर


पुणे:वाहतूकीसाठी अडचणीचा ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री स्फोट करून जमीनदोस्त करण्यात आला. दरम्यान हा पूल पाडण्यासाठी रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला.
मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा काही भागच पडला. त्यामुळे एनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. सोशल मिडीयावर देखील याची मोठ्या प्रमाणाच चर्चा झाली. आता मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील पूलच्या मजबूतीबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील या पुलाच्या पाडकामानंतर सर्वत्र या पूलाच्या कंत्राटदाराची चर्चा होतेय यामध्ये आता राजकीय नेत्यांनी देखील सहभाग घेतला आहे. वसंत मोरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “६०० किलो स्फोटक, १३५० होल, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत.
यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल.भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन.

Leave a Reply

%d bloggers like this: