fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsSports

१६ वर्षांखालील हॉकी स्पर्धा ; गतविजेत्या सेल अकादमीला सुखजीवन संघाने बरोबरीत रोखले

 पुणे – येथे सुरु असलेल्या एसएनबीपी १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत गतविजेत्या सेल हॉकी अकादमी संघाला रविवारी झालेल्या सामन्यात सुखजीवन स्पोर्टस अकादमी संघाने ३-३ असे बरोबरीत रोखले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक सुखजीवन संघासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या देवनाथ नन्वरने ही संधी साधताना सामना बरोबरीत सोडवला.
सेल संघाला आकाश राजभारने ६व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडीवर नेले. पण, १३व्या मिनिटाला सुनील लाक्राने सुखजीवन संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता.
उत्तरार्धात सेलने तीन मिनिटात दोन गोल नोंदवून आघाडी मिळवली. प्रथम मनीष कुमारने ३५व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला.
त्यानंतर पुढच्याच मिनिटाला मनीषने मैदानी गोल करून आघाडी वाढवली. पण, सुखजीवन संघाच्या युवराज सिंगने ४०व्या मिनिटाला गोल करून पिछाडी कमी केली. त्यानंतर सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना देवनाथने मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सुखजीवन संघाला बरोबरी साधून दिली.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी देखील गोलांचा पाऊस पडला. आज झालेल्या सामन्यातून एकूण ४८ गोल नोंदवले झाले. पश्चिम बंगालच्या खुशिदा स्कूल संघाने भोंगिर हॉकी अकादमी संघाचा ९-० असा पराभव केला. या सान्यात निखिल गोस्वामीने पाच गोल केले.
निकाल –  
 
गट अ : खुशिदा स्कूल, पश्चिम बंगाल : ९ (निखिल गोस्वामी ९, २०, २३, ३०, ५०वे मिनिट, दीपक पटेल १२, ५८वे मिनिट, ओम प्रामाणिक ४१वे मिनिट, सुभजित तमांग ५९वे मिनिट) वि.वि. भोंगीर हॉकी अकादमी, तेलंगणा. मध्यंतर ५-०
गट एच : भारतीय विद्या भवन, कोडागू, केरळ : २ (चरिह शेट्टी ४८ आणि ५१वे मिनिट) वि.वि. हॉकी नाशिक: 0. मध्यंतर ०-०
गट ई : स्मार्ट हॉकी अकादमी, रायपूर छत्तीसगड : ९ (रमन कुमार १८, २७, ५१वे मिनिट,  प्रिन्स कुमार २४, ३६, ३९वे मिनिट,  यदुविंदर सिंग ३२वे,  सुरजित राजभर ३४वे, शुभंकर सोनकर ५०वे) वि.व. तमिळनाडू हॉकी असोशिएनश १ (किशोर के.५२ वे मिनिट) मध्यंतर ३-०
गट जी : सेल हॉकी अकादमी, राउरकेला, ओडिशा : ३ (आकाश राजभर ६वे; मनीष कुमार ३५वे आणि ३८वे मिनिट) बरोबरी वि. सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी, आग्रा: 3 (सुनील लखरा १३वे, युवराज सिंग ४०वे, देवनाथ ननवर ५९वे मिनिट). मध्यंतर १-१
गट ब : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी), अमृतसर: १२ (अर्शदीप सिंग ८वे; साहिबप्रीत सिंग १३वे, १७वे, हर्षदीप सिंग २३, २६, ४६वे मिनिट; जगजीत सिंग ४०वे, ४२, ६०वे मिनिट, गुरुप्रता सिंग ४८, ५९वे मिनिट) वि.वि. बिष्णुपूर हॉकी, मणिपूर: ०. मध्यंतर ५-०
(शनिवारचा सामना) गट ड : वन थाउजंड हॉकी लीग (ओटीएचएल) इलेव्हन, नवी दिल्ली : ९ (अनिल कुमार २रे (पीसी), ४६वे मिनिट, शिवा चौहान २५वे मिनिट,  युवराज ओराव १७, ४०, ६०वे मिनिट, विवेक कुमार राठोड ४२वे; भूपेंद्र सिंग ५७ आणि ५८वे) वि.वि. कोलकाता वॉरियर्स, कोलकाता: १ (पुष्पेंद्र सिंग ३५वे). मध्यंतर ३-०

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading