fbpx

सप्तपदी दुर्गा पूजा महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ  

पुणे : सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित दुर्गा पुजा 2022 महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव  पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे 5 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन यावर्षी आपली पहिला दुर्गा पूजेचा महोत्सव साजरा करत असून हि पूजा पारंपरिक विधी आणि परंपरेनुसार करण्यात आली. यामध्ये पुष्पांजली, आरती,  संध्या पुजा आणि भोग यासारखा गोष्टींचा समावेश होता. या  महोत्सवा  दरम्यान सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्ष अंजना भट्टाचार्य, उपाध्यक्ष सौमित्र कुंडू, सरसचिव रूपा बिस्वास, खजिनदार सोहिनी मित्रा आदी मान्यवरांसह  सप्तपदी सदस्य   उपस्थित होते.

टेरा कोटा पासून बनविलेली दुर्गा मातेची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. यामध्ये लक्ष्मी, गणेश, सरस्वती, कार्तिक यांच्या सोबत दुर्गा एकाच साचात दिसतात. अष्टमीच्या दिवशी विशेष म्हणजे संधी पुजा संपन्न होणार असून त्यानंतर आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवलचा समावेश असणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सिंदूर खेला आणि धुनुची नृत्य सादर केले जाणार आहे. याबरोबरच फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणार्‍यांना अस्सल बंगाली पदार्थ खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. सर्व पुणेकर व भक्तांना सप्तपदी दुर्गा पुजा महोत्सवाचे आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विजयादशमीला या  महोत्सवाचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: