fbpx

माहूरच्या देवस्थान विकासाच्या प्रश्नांवर विधिमंडळाच्या अधिवेशनात घेणार आढावा : डॉ नीलम गोऱ्हे

नांदेड: नाशिक जिल्ह्यातून चांदवड, सप्तशृंगी मंदिरातून सुरू झालेली शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित “बये दार उघड” मोहीम आज माहूरच्या रेणुका देवी दर्शनाने हजारो भक्तांच्या साक्षीने संपन्न झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे तसेच रश्मी वउध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “माहूर देवस्थान आणि परिसर विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात येईल. याकरिता लागणारे सर्व सहकार्य मी देणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात माहूरच्या काही पत्रकारांना विशेष भेटीचे निमंत्रण देत आहे.”

या मोहिमेच्या निमित्ताने राज्यातील सर्व स्तरातील महिलांना त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात मान सन्मान, प्रतिष्ठा, सुरक्षितता, न्याय आणि विकासाच्या संधी मिळावी यासाठी साडे तीन शक्ती पीठाची प्रार्थना केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आली. यावेळी हजारो भाविकांच्या साक्षीने रेणुका देवीच्या चरणी आज सालंकृत पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या वतीने ज्योत प्रज्वलित केली गेली. ही ज्योत दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यास स्थानिक शिवसेना आणि युवासेना महिला आघाडीकडून आणण्यात येईल.

यावेळी महिला आघाडीच्या नांदेड जिल्हा संघटक निकिता चव्हाण, जयश्री कंधारे, त्याचबरोबर शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, शीतल शेठ, शिवसेना महिला पदाधिकारी स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, नागेश पाटील आष्टीकर,
उपजिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे,
ज्योतीबा खराटे (उपजिल्हा प्रमुख), दिपक कन्नलवार(मा.ता.प्रमुख), उमेश जाधव (पं.स.सभापती),विनायक देशमुख (उप ता.प्रमुख), निरधारी जाधव (शहर प्रमुख), ज्ञानेश्वर लाड(उपनगराध्यक्ष), विजय कामटकर (आरोग्य सभापती,.न.पं.), दिपक कांबळे (मा.गटनेता न.पं.),संदिप गोरडे (युवासेना शहर प्रमुख), जितु चोले(सो.मिडीया विधानसभा प्रमुख), सुरेश आराध्ये (ता.संघटक) बजरंग वापगुरे(ता.संघटक किनवट), रुपेश कोवे (मा.नगरसेवक), आशा जाधव(नगरसेविका तथा गटनेता,न.पं.), सौ.सुरेखा बालाजी तळणकर(युवती महिला ता.अधिकारी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: