fbpx

अखेर चांदणी चौकातील पूल मध्यरात्री जमीनदोस्त

पुणे:प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता हा पूल पाडण्यात आला.पूलाचा उर्वरित भाग हा पोकलेनच्या सहाय्याने पाडला गेला. पूल पाडल्यानंतर 5 मिनिटे वाट पाहण्यात आली. वाट पाहण्यात आली. चार पोकलेनच्या सहाय्याने याचे उर्वरित भाग पाडण्यास सुरूवात करण्यात आली. वाहतुकीसाठी अजूनही रस्ता बंद करण्यात आलेला आहे. चांदणी चौकातला ढिगारा हटवला जात आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुलाच्या खाली सध्या चार लेन असून, तेथे आता 14 लेन करण्यात येणार आहेत. पूल पाडल्यानंतर ५ मिनिटे वाट पाहण्यात आली. चार पोकलेनच्या सहाय्याने याचे उर्वरित भाग पाडण्यास सुरूवात केली.सकाळी 8 वाजता रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

मध्यरात्री २.२३वाजताच्या सुमारास चांदणी चौक येथील पूल स्फोटकांच्या सहाय्याने पाडण्यात आला. कंट्रोल ब्लास्ट पद्धत यासाठी वापरण्यात आली. पूल पाडण्यासाठी साधारण 35 मिमी व्यासाचे आणि दीड ते दोन मीटर खोलीचे तेराशे छिद्रे पाडण्यात आली. त्यात 600 किलो इमल्शन स्फोटके भरली होती. एक हजार 350 डिटोनेटर उपयोगात आणूननियंत्रित पद्धतीने स्फोट करण्यात आला. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांंनी यासाठी मार्गदर्शन केले.


पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यात 16 एक्सेव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर यांचा समावेश आहे. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: