fbpx

श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे :श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न झाला
आदर्श माता पुरस्कार चिंचवड येथील सौ.सरलाबाई पोपटलालजी नाहर व औरंगाबाद येथील  श्रीमती विमल ताई बाबूलालजी नाहर औरंगाबाद यांना देण्यात आला याप्रसंगी कुमारी देशना आदित्य नाहर हिला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

कुमारी देशना आदित्य नाहर हिने वीस कारच्या खालून स्केटिंग करीत विश्वविक्रमी फक्त 13 .74 सेकंदात पूर्ण केली
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने  आदर्श माता पुरस्कार व लिटल मास्टर विशेष पुरस्कार दिले ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे
यावेळी कुमारी देशना आदित्य नाहर हिचे त्यांनी कौतुक देखील केलं तसेच संस्थापक अध्यक्ष राजेश नहार कुमरी देशना हिला केंद्राकडून बाल पुरस्कार मिळावा ही विनंती चंद्रकांत पाटील यांना करण्यात आली, त्यावर दादांनी यावर नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनीसुद्धा व पुरस्कारांचे अभिनंदन केले.
तसेच नवरात्री उत्सवामध्ये आदर्श माता पुरस्कार उत्तम प्रकारे केल्याबद्दल अध्यक्ष राजेश नहार यांचे सुद्धा अभिनंदन केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रमुख अतिथी माणिकचंद ग्रुप चे उद्योगपती प्रकाश  रसिकलालजी धारीवाल पूना मर्चंट चेम्बर अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया , लालचंदजी नहार  श्री भवानी माता जैन ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर ,कोषाध्यक्ष नगरशेठ रसिकलाल नाहर , उपाध्यक्ष सुभाष नाहर व  ट्रस्टी संगीता नाहर तसेच मनिषा नाहर यांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
अनिल नाहर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला सदर कार्यक्रमास जैन समाजाचे नाहर परिवाराचे मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: