fbpx

संस्कार भारतीच्या कलाकारांचे गुवाहाटी मध्ये ‘लोक मे शक्ती आराधन’ नृत्य नाटिकेचे सादरीकरण

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग अंतर्गत ‘लोकमंथन २०२२’ कार्यक्रम : संस्कार भारती पुणे महानगरच्या नृत्य विधेतील कलाकारांचे सादरीकरण

पुणे :  केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग अंतर्गत लोकमंथन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन गुवाहाटी येथील श्रीमद शंकर देव कलाक्षेत्र येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात संस्कार भारती पुणे महानगरच्या नृत्य विधेतील कलाकारांचे सादरीकरण केले. भारतभूमीवर केली जाणाऱ्या वैविध्यपूर्ण शक्ती आराधनेला अभिव्यक्त करणारी ‘लोक मे शक्ती आराधन’ ही नृत्य नाटिका कलाकारांनी सादर केली.

या कला महोत्सवाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, रा.स्व. संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे उपस्थित होते.

या कार्यक्रमात भारतीय संत संस्कार व वारी परंपरा या विषयावर डॉ. मुकुंद दातार यांचे व्याख्यान झाले.

संस्कार भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितेश भारद्वाज यांनी नृत्य नाटिकेसाठी आवाज दिला. याची मूळ संहिता लेखन व दिग्दर्शन मैत्रेयी बापट यांचे आहे. संहिता विशेष मार्गदर्शन रविंद्र भारती यांचे लाभले आहे. कार्यक्रम प्रस्तुती संयोजन संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र महामंत्री सतीश कुलकर्णी यांचे आहे.  संगीत संयोजन मैत्रेयी बापट, गायन निधी नायर, मृदंग – पंचम, बासुरी संजय शशिधरन, प्रकाश संरचना आस्था कार्लेकर, रेकॉर्डींग मल्हार प्रॉडक्शन- महेश लिमये यांचे तर नृत्य प्रस्तुती मैत्रेयी बापट, रश्मी म्हसवडे, आस्था कार्लेकर, सायली काणे, सायली देवधर, ईशा वेलणकर, कल्याणी साळेकर, हेमांगी ठाकूर, मधूरा हुबळीकर, तनया कानिटकर, स्वप्ना रत्नाळीकर, सुरभी बोडे, सुजा दिनकर, नेहा दाते, प्राजक्ता ढोबळे यांची होती. लोक कलेचे उपासक या नात्याने शाहीर हेमंत मावळे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: