Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चांदणी चौकातील राडारोडा हटवण्याचा काम सुरू; वाहतूक अजूनही बंदच

पुणे:प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता हा पूल पाडण्यात आला
चांदणी चौकातील पूल पाडलेल्या ठिकाणी राडाराडा काढण्याचे काम सध्या सुरू असून अजूनही दहा ते पंधरा टक्के राडारोडा जागेवर आहे. त्यामुळे राडारोडा काढण्यास विलंब होत आहे.त्यामुळे माहामार्गवरून वाहतूक सुरू करण्यास होण्यास किमान सकाळी 10 वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गाने, शहरातील रस्त्यावरून पुढे जावे लागणार आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एन डी ए रस्ता – बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पुल पाडण्यात आला. दरम्यान रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र राडारोडा कठीण असल्याने रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तो काढणे अद्याप शक्य झाले नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने रविवारी सकाळी 8 वाजता महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अवजड वाहतूकीसह हलक्या वाहना हि मोठा वळसा घालून जावा लागणार आहे.सध्या मुंबईहून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक उर्से टोल नाका येथे, तर साताऱ्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खेड शिवापूर येथे थांबविण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणाहून सध्या हलक्या वाहनांना शहरातून पुढे जाण्यास मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, पुलाचा राडारोडा काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम अजून शिल्लक आहे. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची नियोजित 8 वाजताची वेळ पूर्ण होणार नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे.
पर्यायी मार्ग
मुंबईकडून सातारा, कोल्हापूर येठे जाण्यासाठी

संबंधित वाहनांनी उर्से टोल नाका येथून जुना मुंबई पुणे महामार्ग किंवा रावेत, वाकड, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे पुढे जाता येणार आहे.

सातारा, कोल्हापूर येथून मुंबईकदे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज, स्वारगेट, टिळक रस्ता येथून किंवा धायरी, सिंहगड रस्ता, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून औंध, वाकड मार्गे पुढे जावे लागणार आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading