fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चांदणी चौक : अखेर ११ तासानंतर दोन्ही बाजूने वाहतूक पूर्ववत

पुणे: प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता हा पूल पाडण्यात आला. त्यामुळे काल रात्री अकरा ते सकाळी दहा चांदणी चौकातील वाहतूक प्रशासनाने बंद केली होती.

आज सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली. 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक दोन्ही बाजूने पूर्ववत झाली.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एन डी ए रस्ता – बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पुल पाडण्यात आला. दरम्यान रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे कामाच्या ठिकाणी संपूर्ण रात्र थांबले होते.कामाच्या ठिकाणी ते आढावा घेत होते. सकाळी 8 वाजता काम पूर्ण होत नसल्याने त्यांनी काही वेळात राडारोडा काढून झाल्यानंतर रस्ता खुला होईल. असे सांगितले होते. त्यानुसार, कामाला आणखी गती देण्यात आली. काम अतिशय वेगाने पूर्ण करून 10 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकातील मुंबईहून सातारा, पुण्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
त्यानंतर वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी साताऱ्याहून येणारी वाहनेही एकच लेन मधून मुंबई चा दिशेने सोडण्यात आली. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 पर्यंत बंद असलेला महामार्ग 10.8 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
पर्यायी मार्ग रात्री ११ते सकाळी १०वाहन चालकांना हे होते.
मुंबईकडून सातारा, कोल्हापूर येठे जाण्यासाठी
संबंधित वाहनांनी उर्से टोल नाका येथून जुना मुंबई पुणे महामार्ग किंवा रावेत, वाकड, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे पुढे सातारा, कोल्हापूर येथून मुंबईकदे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज, स्वारगेट, टिळक रस्ता येथून किंवा धायरी, सिंहगड रस्ता, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून औंध, वाकड मार्गे पुढे

Leave a Reply

%d bloggers like this: