fbpx

पाकिस्तान झिंदाबाद  घोषणे च्या निषेधार्थ युवासेने चे पाकिस्तान च्या झेंड्याला लाथो मारो आंदोलन

पुणे: पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान झिंदाबाद व हिंदुस्थान मुर्दाबाद” च्या घोषणा देण्यात आल्या . त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी युवासेना पुणे शहर चा वतीने पाकिस्तान त्या झेंड्याला लाथा मारल्या.

या आंदोलनाला युवा सेनेचे राजेश पळसकर, राम थरकूडे, गौरव पापळ, मयूर पवार ,सनी गवते, निरंजन दाभेकर विकास दाभेकर, गौरव गायकवाड युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरव पापळ म्हणाले,NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद व हिंदुस्थान मुर्दाबाद” च्या घोषणा देण्यात आल्या . या ज्या घोषणा देण्यात आल्या एकदम चुकीच्या आहेत. कुठलीही संघटना असली तरी या घोषणा देणे एकदम चुकीचे आहे. भारतात अशा घोषणा आम्ही कदापि सहन करणार नाही .जर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी भारताची माफी मागितली नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. असे गौरव पापळ म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: