fbpx

शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेच्या वतीने आदिशक्तीला आवाहन करणारी मोहीम

पुणे: आज बांद्रे मातोश्री येथील शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेच्या ‘प्रथम ती’ टीम यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी संबोधित केले. या बैठकीचे संयोजन डॉ.नीलम गोऱ्हे व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले. या बैठकीमध्ये २६ सप्टेंबर पासून ते ४ ऑक्टोबर पर्यंत नवरात्र आहे. त्या नवरात्राच्या निमित्ताने आदिशक्तीला आवाहन करणारी “बये दार उघड” ही मोहीम राज्यात घेण्याचा निर्णय झाला. यामध्ये श्री आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांना शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे व महिला आघाडीच्या पदाधिकारी भेट देणार आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी आरती करून देवीला आवाहन करणार आहेत.

आज बैठकीत बोलत असताना शिवसेनेचे युवानेते आदित्यजी ठाकरे यांनी महिलांच्या विविध घटकांमध्ये ज्या स्त्री आहेत त्या स्त्रियांशी संवादाची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर या मोहिमेचे सुद्धा अशा पद्धतीने “बये दार उघड” ही मोहीम सुरू करण्याची त्यांनी घोषणा केली.

ही मोहीम पुढीलप्रमाणे असेल :
मंगळवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२२ रोजी चांदवड, जिल्हा नासिक
बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सप्तश्रृंगीगड, जिल्हा नासिक

गुरुवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ. रश्मीवहिनी उद्धव ठाकरे टेंभी नाका, ठाणे येथे देवीची आरती करणार आहेत.
याच दिवशी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या टीमचे कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतील.

शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर तुळजाभवानी देवीचे दर्शन, तुळजापूर, जिल्हा धाराशिव,
रविवार, दिनांक ०२ ऑक्टोबर रेणुकामाता देवीचे दर्शन, माहूर, जिल्हा नांदेड,
मंगळवार, दिनांक ०४ ऑक्टोबर एकविरा देवीचे दर्शन, कार्ला, तालुका मावळ, जिल्हा पुणे

शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, विशेषतः महिलांच्या प्रगतीसाठी तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्त्रियांचा सहभाग हा समाज विकासामध्ये अग्रणी असावा या दृष्टिकोनातून ही विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. महिला सुरक्षा, न्याय, विकास या कामांमध्ये सरकारच्या व समाजाच्या अनेक योजनांचा मोठा वाटा असला तरीही स्त्रीला असलेल्या अनेक प्रश्नांचा आत्मविश्वासाने त्यांचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी तुमच्या सोबत आहे. ही मैत्रीची भावना दृढ करण्याचा हेतू असल्याचे यावेळी सांगितले.

या साडेतीन शक्तीपीठांना भेटी देताना अनेक महिला आघाडी पदाधिकारी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समवेत असणार आहेत. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या आशा मामिडी,संगीता खोदाना, दीपा पाटील, युवती सेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ, शर्मिला येवले आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यातील काही ठिकाणी शिवसेना पदाधिकारी संवाद, अनौपचारिक बैठका, पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

या सर्व पदाधिकारी साडेतीन पिठाच्या ठिकाणाहून ज्योती घेऊन त्या ज्योती दसऱ्या मेळाव्याला मुंबईत शिवतीर्थावर आणण्यात येणार आहेत.

शिवतीर्थावरील महामेळाव्यात राज्यातील विविध देवळातील देवतांचा प्रसाद ज्योतीच्या सोबत अर्पण करण्यात येईल अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

या बैठकीला युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे, ऊपसभापती विधान परिषद व शिवसेना ऊपनेत्या नीलम गोर्हे , शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत,मीना  कांबळी, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महीला आघाडी पदाधिकारी आशा मामिडी, ज्योती ठाकरे, अनिता बिर्जे, सुवर्णा करंजे, तृष्णा विश्वासराव, अंजली नाईक, संजना घाडी, संध्या दोषी, स्नेहल मांडे, दीपा पाटील, रंजना नेवाळकर, तेजश्री घोसाळकर, शिल्पा सरपोतदार, शिल्पा बोडखे, संगीता खोदाना, दुर्गा भोसले, सुप्रदा फातरपेकर शीतल शेठ, शर्मिला येवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: