डिसेंबर अखेर महापालिकेच्या निवडणुका होतील रामदास आठवले यांचे भाकीत
पुणे : राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या तीनचा प्रभाग रचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर सरकारने शिंदे व फडणवीस सरकारने चारचा प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदे व फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पुण्याच्या चारचा प्रभाग रचन ला स्थगिती दिली. त्यावर पण आधीच्या ठाकरे सरकारनं प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला त्यामूळे निवडणुका लांबणीवर पडल्या .आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या,पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना वर्तविले.
रामदास आठवले म्हणाले,आज बालगंधर्व रंगमंदिरात अरपीआयच संमेलन झालं. आरपीआयचीनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवी कमिटी स्थापन करण्यात आली आहे.आज फक्त ६ जणांची निवड करण्यात आली आहे. असे रामदास आठवले म्हणाले.
दलितांवर राज्यात होणाऱ्या अत्याचार हे वाढले आहेत. यामुळे दलित समाज सुद्धा आक्रमक झाला आहे. त्यावर दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही संघर्ष करणार. असे आश्वासन यावेळि रामदास आठवले यांनी दिले.
शिवसेना व भाजप यांची आधी युती भाजप आणि शिवसेनेची होती. पण आता युती तुटल्यामुळे शिंदे शिवसेना गट व भाजप एकत्र आले आहेत. त्यावर रामदास आठवले म्हणाले,आधी शिवसेना ही भाजप सोबत आणि आरपीआय सोबत होती .पण मधल्या काळात ती दूर गेली.पण आता खरी शिवसेना आमच्या सोबतच आहे.आर पी आय आगामी काळात भाजप, एकनाथ शिंदे गट एकत्र राहील. असे रामदास आठवले म्हणाले.
आर पी आय,भाजप, एकनाथ शिंदे गट निवडणुका एकत्र लढणार का या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले,एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या बरोबर आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका लढणार आहोत . असे रामदास आठवले म्हणाले.
