५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के , आम्ही आहोत पक्के – रामदास आठवले
पुणे: सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होत. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं होत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगले तापले होते.यावरच पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा समाचार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतला.
रामदास आठवले म्हणाले, ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के , आम्ही आहोत पक्के असं पत्रकारांना कविता ऐकवत रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आज ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी, शिंदे व फडणवीस सरकारने जी अमृत योजना व विविध समस्या बद्दल रामदास आठवले यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर रामदास आठवले म्हणाले, ब्राह्मण संघाच्या आनंद दवे यांची भेट झाली अमृत योजना जी आहे त्या बद्दल चर्चा झाली.ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवे अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले,मला या प्रकरणी डिटेल्स माहिती नाही, आधिक माहिती नाही. असे रामदास आठवले म्हणाले.
शिंदे व फडणविस सरकारच्या सत्तेमध्ये आम्हाला अधिक जागा मिळाव्या. आणि सत्तेत देखिल वाटा यासाठी मी बावनकुळे आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे . असे रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. मुंबईमध्ये पक्षाचा पदाधिकाऱ्यासंमोर दिलेल्या भाषणामध्ये राज यांनी भारतामधून फरार झालेल्या झाकीर नाईकचा उल्लेख करत नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले,राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं हा त्यांचा विषय आहे. मी त्यावर बोलणार नाही.असे रामदास आठवले म्हणाले.
