Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – 4 सदस्य प्रभाग झाल्यामुळे 7 नगरसेवक कमी होणार

पुणे:पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभाग रचना व त्यानुसार मतदार यादी आरक्षण अंतिम झालेले असताना शिंदे फडणवीस सरकारने मात्र या सर्व प्रक्रियेला धक्का लावलेला आहे. पुणे महापालिकेसाठी २०१७ प्रमाणे चार सदस्यांची प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या बदलून १७३ ऐवजी १६६ होणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ इतकी आहे. आज सरकारने घेतलेला निर्णयानुसार या शहराची लोकसंख्या तीस लाखापेक्षा अधिक आहे तेथे नगरसेवकांची संख्या १६१ ते १७५ या दरम्यान असावी असे स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक १ लाख लोकसंख्येसी एक नगरसेवक याप्रमाणे पुणे शहरात १६६ इतकी नगरसेवकांची संख्या निश्चित होणे ही शक्यता आहे.

महाविकास आघाडीने चार ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुण्यात ५८ प्रभाग आणि १७३ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून त्यावर हरकती सूचना घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. तसेच प्रभाग निहय मतदार याद्यांची फोड देखील करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवल्याने या १७३ प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांचे आरक्षण देखील निश्चित झालेले आहे.

या आरक्षणाची अधिसूचना पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. असे असताना आज शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला, तसाच ही प्रभाग रचना २०१७ प्रमाणे असेल असेही त्यात निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आत्तापर्यंत सगळ्या झालेल्या प्रक्रियेवरच प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ व नामुष्की ओढवलेली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading