fbpx

आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी मुरिएल पुणे संघाची कर्णधार

पुणे – अनुभवी मध्यरक्षक मुरिएल अॅडम हिच्याकडे आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. डब्लूआयएफ वरिष्ठ गटात होणारी ही आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धा पालघर येथे होणार आहे.
एका आठवड्याच्या निवड चाचणी शिबिरानंतर पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेने या स्पर्धेसाठी आज १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. मुख्य प्रशिक्षक दर्शना सणस आणि संघ व्यवस्थापक ऋतुजा गुणवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

पुणे संघाचा पहिला सामना पालघर आणि अमरावती यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

पुणे जिल्हा संघ – मुरिएल अॅडम (कर्णधार), अंजली बारके (उपकर्णधार), ऐश्वर्या जगताप, स्मिधी खोकले, सपना राजपुरे, किरण जाधव, हर्षदा काळभोर, अनुष्का पवार, सानिका देशपांडे, निधी वर्मा, किर्ती गोसावी, धनश्री लांडगे, उर्वी साळुंखे, अनुशा वाकनीस, झारा उनवाला, श्रेया पंचवाघ, वेदांगी गंधे, अर्चिता सिंग प्रशिक्षक – दर्शना सणस, व्यवस्थापक – ऋतुजा गुणवंत शिंदे,

Leave a Reply

%d bloggers like this: