Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी सुनावणी
दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आजचा युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी पहिल्याच क्रमांकावर सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची ? विधानसभेचे अध्यक्ष पद निवडणुक कायदेशीर आहे का?, शिंदेगट निवडणूक आयोगाकडे का गेलं आहे? आदी विषयांवर देखील युक्तिवाद झाला. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी सुनावणी होणार आहे.
